Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:53 AM2024-05-20T08:53:41+5:302024-05-20T08:54:28+5:30
Mumbai Lok Sabha elections 2024: अनेक कलाकार सकाळी लवकर मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज (२० मे) महाराष्ट्रातील १३ मतदारसंघासह देशातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्येच अक्षयकुमारपासून प्रशांत दामलेंपर्यंत अनेकांनी मतदान केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर मुंबईतील काही मतदान केंद्राबाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतांना दिसत आहेत.
#WATCH | Actor Akshay Kumar arrives at a polling booth in Mumbai to cast his vote for the fifth phase of #LokSabhaElections2024. pic.twitter.com/ar0utFu7ow
— ANI (@ANI) May 20, 2024
#WATCH | Mumbai: Veteran Actress Shobha Khote casts her vote at a polling station in Mumbai for #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) May 20, 2024
She says, "I have voted for the right candidate. I did not opt for home-voting and voted here so that people get inspired and come out and vote..." pic.twitter.com/kRpUFOVpwo
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार, फरहान अख्तर, जोया अख्तर, जान्हवी कपूर, प्रशांत दामले, शोभा खोटे यांसारख्या अनेक कलाकारांनी मतदान केलं.
#WATCH | Maharashtra: Actor Farhan Akhtar and Director Zoya Akhtar show their inked fingers after casting their votes at a polling station in Mumbai.#LokSabhaElectionspic.twitter.com/ESpxvZNuGN
— ANI (@ANI) May 20, 2024
#WATCH | Bollywood Actress Janhvi Kapoor casts her vote at a polling station in Mumbai for #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) May 20, 2024
"Please come out and vote, " she says pic.twitter.com/5Ki6JH30Et
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. राज्यातील २६४ व देशातील ६९५ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.