Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:50 IST2024-06-04T15:38:02+5:302024-06-04T15:50:15+5:30
सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेतील कंगनाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत.

Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदाच्या निवडणूकीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना तिकीट मिळालं होतं. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतलाही मंडी या मतदारसंघातून तिकीट मिळालं. कंगनाने भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीत कंगनाने विजय मिळवला आहे.
सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेतील कंगनाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. "तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम यासाठी समस्त मंडीवासियांचे मी आभार मानते. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपावरील विश्वासाचा हा विजय आहे. सनातन धर्म आणि मंडीच्या सन्मानाचा हा विजय आहे", असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंगनाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. मराठी अभिनेता श्रेयस तळपदेनेदेखील कंगनाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. "Heartiest congratulations", अशी कमेंट करत श्रेयसने कंगनाचं अभिनंदन केलं आहे.
कंगना सध्या ७२ हजार ८५३ मतांच्या आघाडीवर आहे. कंगनाला एकूण ५ लाख २४ हजार ७९ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत ती काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना पराभूत करुन विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतं मिळाल्यानंतर चाहत्यांकडून कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.