ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:49 PM2021-11-30T18:49:25+5:302021-11-30T18:51:17+5:30

चमचमत्या ताऱ्यांचा होणार सन्मान; लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळा उद्या रंगणार

Lokmat Most Stylish Awards 2021 to be held in Mumbai | ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत 

ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत 

googlenewsNext

लोकमत मीडियाचा 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा २ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील सहारा स्टारमध्ये होणार आहे. या सोहळ्याचं हे पाचवं वर्ष आहे. मागील सोहळ्यांपेक्षा यंदाचा पुरस्कार सोहळा अधिक लक्षवेधी असेल. त्यात मनोरंजन, फॅशन, बिझनेस, राजकारण आणि क्रीडा जगतातील अनेक आयकॉन्स सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स'नं सन्मान करण्यात येईल. या सोहळ्याला सनी लिओनी, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

अवघ्या चार वर्षांत लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सनं वेगळी उंची गाठली आहे. हृतिक रोशन, रणवीर सिंग, आदित्य ठाकरे, अजय देवगण, गौतम सिंघानिया, गौर गोपाल दास, करण जोहर, सारा अली खान, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, अतुल कसबेकर, साजिद नाडियाडवाला, राधिका आपटे, स्वप्निल जोशी, सोनू निगम, तापसी पन्नू, ऋजुता दिवेकर, मसाबा गुप्ता, शायना एनसी, क्रिती सनॉन, काजोल, मलायका अरोरा, भुवन बाम, आयुष्यमान खुराना, पुनित गोयंका, पंकजा मुंडे, महेश कोठारे, संजय सेठी यासारख्या एकापेक्षा एक 'स्टाईल आयकॉन्स'ना गेल्या चार वर्षांत 'मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स'नं सन्मानित करण्यात आलंय. 

LMS सोहळ्याचे डिजिटल स्पॉन्सर असलेल्या जोश ॲपबद्दल...
जोशची सुरुवात ऑगस्ट २०२० मध्ये झाली. मेड इन इंडिया शॉर्ट व्हिडीओ ऍप असलेलं जोश व्हर्स इनोव्हेशननं लॉन्च केलं. सध्या ते १४ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. देशातील १ हजाराहून अधिक टॉप बेस्ट क्रिएटर्स, २० हजार स्ट्राँग मॅनेज्ड कम्युनिटी क्रिएटर्स, १० मोठी म्युझिक लेबल्स, सव्वा कोटीहून अधिक यूजीसी क्रिएटर्स असलेलं जोश सध्या भारतातलं सर्वात वेगानं वाढणारं आणि सर्वाधिक एन्गेजमेंट्स असणारं शॉर्ट व्हिडीओ ऍप असून ते प्ले स्टोअरवरून ते १० कोटीपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड केलं आहे. 

जोश ॲप इन्स्टॉल करण्यासाठी क्लिक करा

Web Title: Lokmat Most Stylish Awards 2021 to be held in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.