पॉवर गर्ल! शिल्पा शेट्टीला ‘लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन’ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:22 PM2023-09-12T23:22:11+5:302023-09-12T23:23:00+5:30
Lokmat Most Stylish Award 2023 : शिल्पाला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याच्या माध्यमातून केला जातो. यंदाही 'लोकमत मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्ड सोहळा' मोठ्या दिमाखात पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'च्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गौरव करण्यात आला. शिल्पाला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिल्पा शेट्टीने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले. सुखी या तिच्या आगामी चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
९०च्या दशकात अभिनयाबरोबर सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या अभिनेत्रींपैकी शिल्पा शेट्टी एक आहे. शिल्पा शेट्टीने ‘धडकन’, ‘बाझीगर’, ‘इंडियन’, ‘रिश्ते’, ‘हिंमत’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. २००९ साली शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राबरोबर लग्नगाठ बांधत संसार थाटला. तिला समीशा आणि विहान ही दोन मुलं आहेत. शिल्पा शेट्टी ‘सुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.