LOL! भाईसाहब ये क्या कर रहे हो...? पाहा, ‘लुकाछुपी’च्या ट्रेलरवरचे  ‘एक से बढकर एक’ मीम्स !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 11:08 AM2019-01-25T11:08:10+5:302019-01-25T11:10:08+5:30

कालचं ‘लुकाछुपी’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. पण ट्रेलर रिलीज होऊ काही तास होत नाही तोच, इंटरनेटवर या ट्रेलरवरच्या भन्नाट मीम्सचे पीक आले.

LOL! Hilarious Memes From Kartik Aaryan, Kriti Sanon Film Luka Chuppi are Newest Internet Rage | LOL! भाईसाहब ये क्या कर रहे हो...? पाहा, ‘लुकाछुपी’च्या ट्रेलरवरचे  ‘एक से बढकर एक’ मीम्स !!

LOL! भाईसाहब ये क्या कर रहे हो...? पाहा, ‘लुकाछुपी’च्या ट्रेलरवरचे  ‘एक से बढकर एक’ मीम्स !!

googlenewsNext
ठळक मुद्देभाईसाहब ये क्या कर रहे हो,’ या क्रितीच्या तोंडच्या डायलॉगवर तर नेटकरी इतके भाळले की, त्यांच्या क्रिएटीव्हीटीला आणखीच उधाण आले.

‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुकाछुपी’ हा नवा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. कालचं या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. पण ट्रेलर रिलीज होऊ काही तास होत नाही तोच, इंटरनेटवर या ट्रेलरवरच्या भन्नाट मीम्सचे पीक आले.
ट्रेलरमधील डायलॉग्सवर नेटकºयांनी एकापेक्षा एक धम्माल मीम्स बनवले. ‘भाईसाहब ये क्या कर रहे हो,’ या क्रितीच्या तोंडच्या डायलॉगवर तर नेटकरी इतके भाळले की, त्यांच्या क्रिएटीव्हीटीला आणखीच उधाण आले. मग काय, २ मिनिट ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमधीलअनेक मजेशीर डायलॉग्सवर  ‘एक से बढकर एक’ मीम्स व्हायरल झालेत.   दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. क्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होतोय. 
तूर्तास ‘लुकाछुपी’वरचे हे मीम्स बघा आणि हसा...



















 

 

Web Title: LOL! Hilarious Memes From Kartik Aaryan, Kriti Sanon Film Luka Chuppi are Newest Internet Rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.