पाहा या सुडौल बांध्याच्या अ‍ॅक्ट्रेसचा कातिलाना अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 10:16 PM2017-01-08T22:16:51+5:302017-01-08T23:39:43+5:30

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये मॉडलिंग जगतातून येणाºया मॉडेल्सची जबरदस्त डिमांड होती. याचे कारण सोपे होते, ते म्हणजे त्यांचा सुडौल बांधा. ...

Look at the murderer's murderous actress | पाहा या सुडौल बांध्याच्या अ‍ॅक्ट्रेसचा कातिलाना अंदाज

पाहा या सुडौल बांध्याच्या अ‍ॅक्ट्रेसचा कातिलाना अंदाज

googlenewsNext
ही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये मॉडलिंग जगतातून येणाºया मॉडेल्सची जबरदस्त डिमांड होती. याचे कारण सोपे होते, ते म्हणजे त्यांचा सुडौल बांधा. मात्र सध्या बॉलिवूडमध्ये सुडौल बांध्याच्या आणि भरलेल्या शरीराच्या अ‍ॅक्ट्रेसची रांग लागलेली आहे. विशेष म्हणजे अ‍ॅक्ट्रेसला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या जबरदस्त पसंतीमुळे त्यांची चलती आहे. सोनाक्षी सिन्हा, कॅटरिना कैफ, करिना कपूर, परिणिती चोपडा, सनी लिओनी हे त्यातीलच काही नावे आहेत. या अ‍ॅक्ट्रेसनी कर्वेशियस बॉडी आणि सेक्सी मूव्समुळे बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशाच काही अ‍ॅक्ट्रेसचे फोटोज् आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत...



सोनाक्षी सिन्हा
बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याअगोदर सोनाक्षी सिन्हा हिचे वजन ९० किलोग्राम एवढे होते. जेव्हा तिचे चाहते तिच्या पूर्वीच्या वजनाविषयी ऐकतात तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नाही. कारण सोनाक्षीचा फिगर जबरदस्त असून, बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्रीमध्ये तिची नक्कीच गणना केली जाते. सोनाक्षीने तिचा पहिला सिनेमा ‘दबंग’साठी तब्बल ३० किलो वजन कमी केले होते. 



विद्या बालन
बॉलिवूडमधील विद्या बालन ही एक अशी अभिनेत्री आहे जिला अजिबात चिंता नाही की लोक तिच्या बॉडीविषयी काय विचार करतात. तिला तिच्या सुडौल बांधा आणि अभिनयावर अभिमान आहे. याचा प्रत्यय तिच्या ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमात प्रेक्षकांना आलेलाच आहे. 



कॅटरिना कैफ
 बॉलिवूडमध्ये सर्वच सुपरस्टारसोबत काम करणारी कॅटरिना कैफ तिच्या सुडौल बांध्यामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. कॅटरिनाचा डान्सही करिष्मा करणारा असून, तिचे आयटम सॉँग जबरदस्त हिट झाले आहे. ‘एक था टायगर’ या सिनेमातील सर्वच गाण्यांमध्ये तिने तिच्या मदमस्त फिगरचा जलवा दाखवित प्रेक्षकांना घायाळ केले आहे. 



प्रियंका चोपडा
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचे जलवे दाखविणारी प्रियंका चोपडा हिचा फिगर प्रेक्षकांना वेड लावणारा आहे. भरभक्कम शरीर असलेल्या प्रियंकाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सध्या ती हॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवित आहे.



करिना कपूर
कपूर खानदानातील बेटी करिना कपूर हिचा वेगळा परिचय करून देण्याची काही गरज नाही. २००० मध्ये ‘रिफ्यूजी’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया करिनाने आपल्या मदमस्त फिगरच्या जोरावर अनेकांना खायाळ केले आहे. अनेक हिट सिनेमे देणाºया करिनाला आयटम सॉँगसाठीदेखील ओळखले जाते. करिनाचे आयटम सॉँग आजही प्रेक्षकांना बघायला आवडतात. 



हुमा कुरेशी

हुमा कुरेशी खाण्याची खूपच शौकीन असून, तिला वजन घटविण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मात्र अशातही फिट कसे राहावे हे तिला चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच हुमाचा सुडौल बांधा इंडस्ट्रीतील इतर अ‍ॅक्ट्रेसमध्ये चर्चेचा विषय असतो. 



परिणिती चोपड़ा
प्रियंका चोपडा हिची चुलत बहीण परिणिती चोपडांचा बांधा सुडौल असून ती भरलेल्या अंगाची अभिनेत्री आहे. सुरुवातीला जेव्हा तिने इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती, तेव्हा सुडौल बांध्याच्या जोरावरच तिने चित्रपटांची रांग लावली होती. नुकतेच तिने वजन कमी केले असून, ती आता स्लीम झाली आहे. मात्र तिचा झिरो फिगर आजही आकर्षित करणारा आहे. 



आयशा टाकिया
२००४ मध्ये आललेल्या ‘टारझन द वंडर कार’ या सिनेमातून आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणाºया आयशा टाकिया हिची सुडौल बांध्याच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. सध्या ती इंडस्ट्रीमधून गायब असली तरी, चाहत्यांना तिच्या सौंदर्याची जादू बघायला आजही आवडेल.  



रिचा चढ्ढा
अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणजे भरभक्कम शरीर आणि अभिनयाची खुमासदार लकब याचा मेळ आहे. तिच्या ‘गॅँग्स आॅफ वासेपुर’मध्ये तिचा अभिनय दाद देणारा होता. तर ‘कॅबरे’सारख्या म्युझिकल इरोटिक सिनेमात ती जबरदस्त हॉट अंदाजात बघावयास मिळाली. 



सनी लिओनी
पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या सनी लिओनीने ‘जिस्म-२’मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. पहिल्याच सिनेमात सनीने असे काही सीन्स दिले की, ज्यामुळे प्रेक्षक घायाळ झाले. त्यानंतर आलेल्या सनीच्या एकापेक्षा एक हॉट सिनेमांमध्ये तिने तिच्या सेक्सी आणि कर्वेशियस फिगरचा कातिलाना अंदाज दाखविला. 

Web Title: Look at the murderer's murderous actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.