पहा... ‘तुम बिन 2’चे नवे गाणे ‘तेरी फरियाद...’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2016 03:40 PM2016-10-04T15:40:27+5:302016-10-04T21:15:23+5:30

‘तुम बिन’चा सिक्वल असलेल्या ‘तुम बिन 2’मध्येही तेरी फरियाद... हे गाणे कायम आहे. विशेष म्हणजे हे गीत नव्याने रिलीज करण्यात आले आहे.

Look ... you have a new song 'Tera Fariyad ...' | पहा... ‘तुम बिन 2’चे नवे गाणे ‘तेरी फरियाद...’

पहा... ‘तुम बिन 2’चे नवे गाणे ‘तेरी फरियाद...’

googlenewsNext
ong>रोमाँटिक चित्रपट म्हणून आजही 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ या चित्रपटाची आठवण केली जाते. या चित्रपटातील ‘कोई फरियाद’ हे गाणे आजही अनेकांच्या ओठांवर आहे. जगजित सिंग व रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणे ‘तुम बिन’चा सिक्वल असलेल्या ‘तुम बिन 2’मध्येही कायम आहे. विशेष म्हणजे हे गीत नव्याने रिलीज करण्यात आले आहे. 



जगजित सिंग व रेखा भारद्वाज यांच्याच स्वरातील या गाण्याची शब्दरचना शकिल आजमीची आहे. संगीत अंकित तिवारी याचे आहे. ‘तेरी फरियाद’ प्रदर्शित झाल्यावर यु-ट्युबवर चाहत्यांचे लाईक्स मिळत आहेत. या नव्या गाण्यात तेव्हा गाळलेल्या काही शब्दांचा व कडव्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात नेहा शर्मा, आदित्य सील व आशीम गुलाटी यांच्या सोबत कंवलजीत सिंग यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 

चला तर पाहूया कसे आहे हे नवे गाणे....

Web Title: Look ... you have a new song 'Tera Fariyad ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.