भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट आऊट, रणबीर-आलिया अन् विकी कौशल झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:06 PM2024-09-14T14:06:44+5:302024-09-14T14:07:19+5:30

या स्टारकास्टमुळे आतापासूनच सिनेमा चर्चेत आहे. दरम्यान आता नुकतीच सिनेमाची रिलीज डेटही आऊट झाली आहे.

Love and War release date out Starring Ranbir kapoor alia bhat and vicky kaushal | भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट आऊट, रणबीर-आलिया अन् विकी कौशल झळकणार

भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'ची रिलीज डेट आऊट, रणबीर-आलिया अन् विकी कौशल झळकणार

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची जोरदार चर्चा आहे.  यामध्ये बॉलिवूडमधलं चर्चेतलं त्रिकुट दिसणार आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) ही रिअल लाईफ जोडी आणि विकी कौशल (Vicky Kaushal) असे तिघंही झळकणार आहेत. या स्टारकास्टमुळे आतापासूनच सिनेमा चर्चेत आहे. दरम्यान आता नुकतीच सिनेमाची रिलीज डेटही आऊट झाली आहे.

संजय लीला भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. यासाठी रणबीर, आलिया आणि विकी वेगवेगळ्या वेळी भन्साळींच्या घरीही गेलेले दिसले. आलिया आणि विकीने 'राजी' सिनेमात एकत्र काम केलं आहे. तर रणबीर आणि आलियाने 'ब्रह्मास्त्र' मध्ये काम केलंय. विकी आणि रणबीरनेही 'संजू' सिनेमात स्क्रीन शेअर केली आहे. आता पहिल्यांदाच हे तिघंही एकत्र स्क्रीनवर दिसतील. चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण या सिनेमासाठी बरीच वाट पहावी लागणार आहे. लव्ह अँड वॉर याही नाही आणि पुढच्याही वर्षी येणार नाही. तर हा सिनेमा थेट २०२६ साली २० मार्च रोजी रिलीज होणार आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनीच ही रिलीज डेट सर्वांसमोर आणली. 

लव्ह अँड वॉर सिनेमाने २०२६ सालचा ईदचा मुहुर्त घेतला आहे. पण दुसरीकडे ही देखील चर्चा आहे की शाहरुख खानचा 'किंग' ही त्याच दिवशी रिलीज होणार आहे. असं झालं तर शाहरुख आणि या तीनही स्टार्समध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. 

रणबीर कपूरने नुकतंच 'रामायण'च्या पहिल्या शेड्युलचं शूट पूर्ण केलं आहे. तर आलिया भटचा 'जिगरा' लवकरच रिलीज होणार आहे. विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Love and War release date out Starring Ranbir kapoor alia bhat and vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.