Love at First Sight

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2016 09:36 AM2016-03-15T09:36:43+5:302016-03-15T02:38:45+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींचा ...

Love at First Sight | Love at First Sight

Love at First Sight

googlenewsNext
्या बॉलिवूडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींचा आता त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच भयंकर संताप उडत आहे. विराट-अनुष्का,रणबीर-कॅटरिना यांच्याबाबतीतही असेच घडत आहे. मात्र या सेलिब्रेटींचे पहिल्यांदाच ब्रेकअप झाले का असा जर प्रश्न विचारला तर याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे ‘नाही’! खरं तर बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटींचे कधी-कोणाशी सूत जुळेल अन् कधी ब्रेकअप होईल याचा अंदाज लावणेच कठीण आहे. अशाच काही सेलिब्रेटींच्या पहिल्या अफेयरचा घेतलेला हा आढावा...
अनुष्का शर्मा - जोहेब यूसुफ
क्रिकेटर विराट कोहली याच्या प्रेमाचा खुलेपणाने स्वीकार करणाºया अनुष्का शर्माने त्याच्याशी नाते जवळपास तोडले आहे. मैदानातूनच अनुष्काला फ्लार्इंग किस देणाºया विराटला आता तिचे नावही पसंत नाही. पत्रकारांनी त्याला अनुष्काबाबत विचारले असता, त्याचा अचानक भडका उडाला. मात्र अनुष्काचे विराट पहिलेच प्रेम होते, असे अजिबात नाही. जेव्हा ती मॉडलिंग करीत होती, तेव्हा तिचे नाव जोहेब यूसुफ याच्यासोबत जोडले गेले. मात्र अभिनेत्री म्हणून सक्सेस मिळाल्यानंतर अनुष्का आणि जोहेबमध्ये ब्रेकअप झाले. 
ऐश्वर्या रॉय - राजीव मूलचंदानी
मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्या रॉयचे नावही बºयाचशा सेलिबेटींशी जोडले गेले. करिअरच्या अगदी सुरुवातीलाच ती राजीव मूलचंदानी यांच्या प्रेमात पडली. पुढे त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. मात्र त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव सलमान खान, विवेक ओबेरॉय याच्याशी जोडले गेले. त्यानंतर तिचे अभिषेक बच्चन याच्याशी लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे. 
प्रियंका चोपडा - असीम मर्चेंट
बॉलिवूडची देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियंका चोपडा सध्या सिंगल जीवन जगत असली तरी सुरुवातीच्या काळात तिचे अनेक सेलिबेटींबरोबर ना जोडले गेले.  मॉडलिंगच्या काळात प्रियंकाचे असीम मर्चेंट याच्याशी नाव जोडले गेले होते. २००० सालात मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर तिचे असीमबरोबर ब्रेकअप झाले. 

दीपिका पादुकोण-निहार पांड्या
बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणचे आतापर्यंत बºयाचशा सेलिब्रेटींशी नाव जोडले गेले. सध्या ती अभिनेता रणवीर सिंहला डेट करीत आहे. मात्र जेव्हा दीपिका मॉडलिंग करीत होती, तेव्हा तिचे नाव निहार पांड्या याच्याशी जोडले गेले. दोघांच्या प्रेमांची त्यावेळेस भरपूर चर्चाही रंगली होती. दोघेही ‘लिव-इन रिलेशनशिप’मध्ये होते. पुढे दीपिकाने बॉलिवुडमध्ये एंट्री केल्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झाले. 

रणबीर कपूर - अवंतिका मलिक
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेल्या रणबीर कपूर याचे कित्येक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. रणबीरचे सर्वात अगोदर अभिनेता इमरान खान याची पत्नी अवंतिका हिच्याशी प्रेमप्रकरण होते. दोघेही जवळपास पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती आहे.

Web Title: Love at First Sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.