उत्कृष्ट कथानकाच्या चित्रपटाची निर्मिती करणं लव्हली फिल्म्सचा उद्देश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 05:50 PM2019-05-03T17:50:11+5:302019-05-03T17:53:42+5:30
‘सेटर्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासह त्यांना सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करणार आहे. ‘लव्हली फिल्म्स’ यांच्यातर्फे आत्तापर्यंत उत्कृष्ट कथानकावर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रातील वाढते बाजारीकरण, पेपर सेटिंग, गैरप्रकार यांच्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती आजपर्यंत करण्यात आलेली आहे. मात्र, ‘सेटर्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासह त्यांना सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करणार आहे. ‘लव्हली फिल्म्स’ यांच्यातर्फे आत्तापर्यंत उत्कृष्ट कथानकावर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे.
तंत्रज्ञानाच्या जगातील दैनंदिन होत असलेला विकास, शिक्षणपद्धती आणि शिक्षणाचे बाजारीकरण या सर्व गोष्टींमुळे विविध प्रकारच्या घटना समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे रोजच्या आयुष्यात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक विषयांना सामोरे जावे लागते. आता असाच शिक्षणाच्या क्षेत्रातील एक विषय घेऊन दिग्दर्शक आश्विनी चौधरी आले आहेत. त्यांनी पेपर सेटिंग करणाऱ्या माफियावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली आहे.
याबाबत बोलताना विकाश मनी म्हणाले,‘ आम्ही कथानक असलेल्या चित्रपटावर जास्तीत जास्त लक्षकेंद्रित करतो. खरंतर कंटेंट हाच किंग असला पाहिजे. आम्ही अजून काही स्क्रिप्टवर काम करत आहोत ज्यावरून आम्ही हॉलिवूडपटाची देखील निर्मिती करू शकू.’
लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित या चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सलीम सुलेमान यांचे चित्रपटाला संगीत लाभलेले आहे.