लुका छुपीचे कमी झाले कलेक्शन, या चित्रपटांनी दिली टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:00 PM2019-03-13T21:00:00+5:302019-03-13T21:00:02+5:30
लुका छुपी या चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे
कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांचा ‘लुका छुपी’ हा सिनेमा १ मार्चला प्रदर्शित झाला असून या दोघांसोबतच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, विनय पाठक, अपारशक्ती खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे ‘मथुरा लाईव्ह’ असे नामकरण आधी करण्यात आले होते. पण पुढे ते बदलून ‘लुका छुपी’ असे ठेवण्यात आले. हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित असून हा कॉमेडी फॅमिली ड्रामा रोहन शंकर यांनी लिहिला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकरने केले आहे.
लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता या चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील या चित्रपटाला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा बदला हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचसोबत कॅप्टन मार्व्हल हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडतो आहे. याच दोन चित्रपटांमुळे लुका छुपी या चित्रपटाचे कलेक्शन कमी झाले आहे. या चित्रपटाने आजवर ६९.४१ इतके कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे.
लुका छुपीचे कलेक्शन कमी झाले असले तरी पुढील काही दिवसांत हा चित्रपट ७५ करोड पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, लुका छुपीला विकेंडला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट पुढील काही दिवसांत ७५ करोड पार करेल. केसरी प्रदर्शित व्हायच्या आधी हा चित्रपट ८० करोड पार करू शकतो. दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी या चित्रपटाने ३.१५ करोड, शनिवारी ५.२० करोड, रविवारी ५.३१ आणि सोमवारी २.०५ करोड इतकी कमाई केली होती. या चित्रपटाने आजवर ६९.४१ करोड कमावले आहेत.
#LukaChuppi is trending well on weekdays... Should cross ₹ 75 cr in coming days... Lack of major opposition [till #Kesari] will help collect an impressive total [₹ 80 cr+ on cards]... [Week 2] Fri 3.15 cr, Sat 5.20 cr, Sun 5.31 cr, Mon 2.05 cr. Total: ₹ 69.41 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) March 12, 2019