लुके केनी म्हणतोय, रॉक ऑन चित्रपटाने मला नवी ओळख मिळवून दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 12:03 PM2017-02-15T12:03:28+5:302018-04-03T14:38:44+5:30

भारतात पहिला विजे म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या लुके केनीने दिग्दर्शक, निर्मिती आणि अभिनेता या तिन्ही क्षेत्रात आपले नशीब आजमावले. ...

Lukke Kenny says rock-on-film gives me a new identity | लुके केनी म्हणतोय, रॉक ऑन चित्रपटाने मला नवी ओळख मिळवून दिली

लुके केनी म्हणतोय, रॉक ऑन चित्रपटाने मला नवी ओळख मिळवून दिली

googlenewsNext
रतात पहिला विजे म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या लुके केनीने दिग्दर्शक, निर्मिती आणि अभिनेता या तिन्ही क्षेत्रात आपले नशीब आजमावले. बॉम्बे बाईज या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर लुके आपल्याला रॉक ऑन आणि  रॉक ऑन 2 या दोन्ही चित्रपटात दिसला. त्याच्या आतापर्यंत प्रवासाबाबत त्यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद.   

तू चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय कधी घेतलास ?
शाळेत असताना नाटकांमध्ये काम करताना ते हळूहळू आवडायला लागले. हे करताना आपल्याला मजा येत असल्याचे लक्षात आला आणि त्याचवेळी अॅक्टिंग करण्याचा विचार डोक्यात आला होता. नाटकाच वेड कॉलेजमध्ये गेल्यावरही कायम होते. त्यामुळे कॉलेजमध्ये ही मी नाटकात काम करत होता. अशाच एका नाटकाच्या प्रयोगाला गजाज उस्ताद आले होते. नाटक संपल्यावर त्यांनी मला विचारले चित्रपटात काम करशील का आणि त्यांनी मला पहिला ब्रेक दिला.

रॉक ऑन आणि 'रॉक ऑन2'मुळे तुझ्या आयुष्यात काय बद्दल झाले ?
रॉक ऑननंतर रॉक ऑन 2 चित्रपट यायला बराच वेळ गेला. रॉक ऑन प्रदर्शित होईपर्यंत मी चॅनेल व्हीला डि.जे म्हणून काम करत होतो. रॉक ऑन चित्रपटाने मला एक नवी ओळख मिळवून दिली. मला स्टेजवर येण्याची संधी दिली.रॉक ऑननंतर  2006मध्ये मी 13th floor या फिर्चर फिल्मचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. 80 मिनिटाच्या या चित्रपटात संध्या मृदूल आणि पूरब कोलीने काम केले होते. हा चित्रपट अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला. तसेच रॉक ऑन2 मधली माझी भूमिका माझ्या इमेजला छेद देणारही होती. 

झोबी सारखे वेगळे चित्रपट तयार करणे सोप्प असते की कठिण ?
झोबी चित्रपट तयार करणे सोपे नसते. झोंबी चित्रपट म्हणजे नेमक काय हे प्रेक्षकांना समजवण्याचे आव्हानही आमच्या समोर होतो. झोबी हा शब्द आफ्रिकेतून आला आला. झोबीचे कलर्च जगभरात मोठे आहे. फ्रान्स ते साऊथ आफिक्रा प्रत्येक देशाच्या त्यांचे झोंबी चित्रपट होते. मात्र भारताकडे त्याचा एकही झोंबी चित्रपट नव्हता. मग मी मॉर्डन झोंबी फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही तरी नवीन आणि क्रिएटीव्ह करायचे होते आणि ते तयार केल्याचा आनंद आहे मला. आजही लोक मला झोंबी चित्रपटामुळे ओळखतात.   

तुझ्या आगामी प्रोजेक्ट विषयी जाणून घ्यायला आवडले.  
माझे आगामी दोन चित्रपट येतायेत. यातील चित्रपट म्युझिक इंडस्ट्रिवर आधारित आहे. 4 लोकांची ही कथा जे  वेगवेगळ्या परिस्थीतीतून आलेले असतात आणि त्यांचा सांगितिक प्रवास यावर आधारित हा सिनेमा आहे तर. चित्रपट सृष्टीतील विविध कलाकार तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील तर दुसर रोमँटिक रोड मूव्ही आहे. बिहारमधल्या राहणाऱ्या मुलीची ही गोष्ट आहे

 तुला चित्रपटासाठी लिहायला आवडेल का ?   
मी सध्या माझ्या आगामी चित्रपटासाठी सहलेखक म्हणून काम करतोय. मला कुणी चित्रपट लिहायला ऑफर दिली तर मला नक्कीच लिहियला आवडले. मी अनेक न्यूज पेपरमध्ये म्युझिक रिलेटेड कॉलम लिहिले आहेत.

तू म्युझिक इंडस्ट्रीतला आहेस त्यामुळे तुला कोणत्या रिअॅलिटी शो जज करण्याची ऑफर आली होती का ? तुझे रिअॅलिटी शोबद्दलचे मत काय आहे?
हो मला एका रिअॅलिटी शो जज करण्याची ऑफर आली होती मात्र मी नकार दिला. अमेरिकेतील रिअॅलिटी शो आणि आपल्याकडेल रिअॅलिटी शो यात फरक आहे. अमेरिकेत रिअॅलिटी शो जिंकलेल्या विजेत्यांना संगीतात करिअर बनवण्याचे  संधी असते मात्र आपल्याकडे एकदा रिअॅलिटी शो संपला की मग कोणाच्या ही काही लक्षात राहत नाही. 

Web Title: Lukke Kenny says rock-on-film gives me a new identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.