मॅडम, मला वाचवा; ‘जब हॅरी मेट सेजल’ पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाने सुषमा स्वराज यांना केले tweet!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 08:41 AM2017-08-07T08:41:05+5:302017-08-07T15:05:36+5:30
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याने ‘जब हॅरी मेट सेजल’ या आपल्या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन केले. पण इतके करूनही प्रेक्षकांनी ...
ब लिवूड सुपरस्टार शाहरूख खान याने ‘जब हॅरी मेट सेजल’ या आपल्या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन केले. पण इतके करूनही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली ती फिरवलीच. चित्रपटाने समीक्षकांची निराशा केली. प्रेक्षकांनाही चित्रपटाने निराश केले. याचदरम्यान एक प्रेक्षक तर इतका निराश झाला की, त्याने चक्क परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना tweet केले. आता हे प्रकरण नेमके काय आहे, हे तुम्हाला कळायलाच हवे.
प्रकरण तसे मजेशीर आहे. यात ‘लीड रोल’ साकारलाय तो विशाल सूर्यवंशी या व्यक्तीने. होय, विशाल सुर्यवंशी हा शाहरूखचा एक चाहता. पुण्यात तो ‘जब हॅरी मेट सेजल’ पाहायला गेला अन् चित्रपटगृहातून थेट सुषमा स्वराजकडे मदत मागण्याची वेळ त्याच्यावर आली. त्याने थेट स्वराज यांना tweet करून मदत मागितली. ‘ मॅडम, मी पुण्यात ‘जब हॅरी मेट सेजल’ बघतोय. कृपया मला येथून लवकरात लवकर वाचवा,’ असे tweet त्याने केले.
विशालने सुषमा स्वराज यांना केलेले हे tweet वेगाने व्हायरल होत आहे. हजारावर लोकांनी ते retweet केले आहे. सुषमा स्वराज यांनी आत्तापर्यंत twitterवर मदत मागणाºया अनेकांना मदत केली आहे. कदाचित म्हणूनच विशालने त्यांच्याकडे मदत मागणे योग्य समजले. ‘जब हॅरी मेट सेजल’ने विशालला इतका वैताग आणला की, त्याने थेट हे tweet करून टाकले.
‘जब हॅरी मेट सेजल’ बॉक्सआॅफिसवर पूणार्थाने अपयशी ठरला आहे. पहिल्या ओपनिंग डेला या चित्रपटाने केवळ १५.२५ कोटींची कमाई केली. शाहरूखच्या गत पाच वर्षांत आलेल्या चित्रपटांपैकी हे सर्वाधिक कमी ओपनिंग डे कलेक्शन म्हणता येईल. ८० कोटी खर्चून ‘जब हॅरी मेट सेजल’ बनवण्यात आला. पण कदाचित ही रक्कमही हा चित्रपट वसूल करतो की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.