वयाच्या ४८ व्या वर्षी बॉलिवूडचा निर्माता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, मधू मंटेनाने ९ वर्ष लहान इरा त्रिवेदीसोबत घेतले सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 08:53 AM2023-06-12T08:53:40+5:302023-06-12T08:55:04+5:30

मधू मंटेनाने पहिलं लग्न फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत केले होते.

Madhu mantena married to yoga guru ira trivedi on sunday wedding pictures viral | वयाच्या ४८ व्या वर्षी बॉलिवूडचा निर्माता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, मधू मंटेनाने ९ वर्ष लहान इरा त्रिवेदीसोबत घेतले सातफेरे

वयाच्या ४८ व्या वर्षी बॉलिवूडचा निर्माता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, मधू मंटेनाने ९ वर्ष लहान इरा त्रिवेदीसोबत घेतले सातफेरे

googlenewsNext

बॉलिवूड इंडस्टीत सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता मधु मंटेनाने रविवारी, 11 जून रोजी योग प्रक्षिशिका आणि लेखिका इरा त्रिवेदीसोबत लग्न बंधनात अडकला आहे. या प्रसंगी दोघांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता.  इरा गुलाबी रंगाच्या कांजीवरम साडीत अतिशय सुंदर दिसत होती. तर मधुने कुर्ता पायजामा आणि त्यावर फेटा बांधला होता. 

इरा त्रिवेदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी आता पूर्ण झाली आहे.' कॅपिटलमधील I आणि M हे इरा आणि मधु यांच्या नावांचे प्रतीक आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. 

मधू मंटेनाने पहिलं लग्न फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत केले होते. मधू आणि मसाबाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले. या वर्षी जानेवारीमध्ये मसाबाने 'बॉम्बे वेल्वेट' फेम अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले, जो आदिती राव हैदरीचा पूर्वाश्रमीचा पती आहे.

मधु मंटेनाच्या लग्नाच्या रिसेप्शनला आमिर खान, हृतिक रोशन, राजकुमार राव आणि कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मधू मंटेनाने अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्यासोबत, 'फँटम' फिल्म्सची सह-स्थापना केली, ज्याने 'क्वीन', 'एनएच 10', 'मसान' आणि 'लुटेरा' सारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

Web Title: Madhu mantena married to yoga guru ira trivedi on sunday wedding pictures viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.