मधूबालाच होत्या पहिली भारतीय अभिनेत्री, ज्यांनी रूपेरी पडद्यावर रंगवली 'पत्रकारा'ची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 11:19 AM2017-02-14T11:19:33+5:302017-02-14T17:41:45+5:30

रूपेरी पडद्यावर पत्रकाराची भूमिका साकराण्याची खरी सुरूवात केली ती मधूबाला यांनी. सध्या काही सिनेमात बी टाऊनच्या ग्लॅमडॉल पत्रकार पेशात ...

Madhubala was the first Indian actress, who played the role of 'journalist' on the silver screen | मधूबालाच होत्या पहिली भारतीय अभिनेत्री, ज्यांनी रूपेरी पडद्यावर रंगवली 'पत्रकारा'ची भूमिका

मधूबालाच होत्या पहिली भारतीय अभिनेत्री, ज्यांनी रूपेरी पडद्यावर रंगवली 'पत्रकारा'ची भूमिका

googlenewsNext
पेरी पडद्यावर पत्रकाराची भूमिका साकराण्याची खरी सुरूवात केली ती मधूबाला यांनी. सध्या काही सिनेमात बी टाऊनच्या ग्लॅमडॉल पत्रकार पेशात पाहायला मिळतात. मात्र या अभिनेत्रींच्या आधी मधूबाला यांनीच1958मध्ये रिलीज झालेल्या कालापानी सिनेमात यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती.यात पत्रकार बनलेल्या मधूबाला यांना रसिकांची खूप पसंती मिळाली. मधूबाला यांनी सिनेमात साकारलेल्या पत्रकाराच्या भूमिकेमुळेच 'पत्रकार' या भूमिकेत अनेक अभिनेत्री विविध सिनेमात झळकू लागल्या. आणि मधूबाला यांनी सुरू केलेली या भूमिकेचा ट्रेंड आजही वेगवेगळ्या अभिनेत्री रूपेरी पडद्यावर साकरताना दिसतात. मधूबाला यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आजच्या अभिनेत्री ही भूमिका साकारतात. 




मधूबाला यांच्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'क्रांतीवर' या सिनेमात डिंपल कपाडिया यांची 'कलमवाली बाई' ही भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. 



'पेज-3' सिनेमात अभिनेत्री कोंकणा सेनने पत्रकार बनत ग्लॅमरस दुनियेचं सत्य समोर आणलं.



तर प्रिती झिंटाने फिल्म 'लक्ष्य'मध्ये आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.




तर दुसरीकडे रानी मुखर्जीने 'नो वन किल्ड जेसिका'मध्ये एक मीडियाची ताकद काय असते हे दाखवून दिले.



जेव्हा जेव्हा मीडिया सेलिंब्रिटींच्या पर्सनल लाइफमध्ये इंटरफेयर करते...तेव्हा तेव्हा या सेलिब्रिटींचा पारा चढतो... करीनानेही मीडियाचा संधी मिळेल तेव्हा चांगलाच समाचार घेतला पण त्यानंतर हीच करीना दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' सिनेमात एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जर्नलिस्टची भूमिका साकारताना रूपेरी पडद्यावर झळकली.सिनेमात हातात माईक घेऊन प्रश्न विचारण्यासाठी करिनाही उत्सुक दिसली इतकंच नाहीतर जेव्हा जेव्हा या भूमिकेविषयी करिना बोलते तेव्हा तेव्हा  या भूमिकेसाठी प्रेरणाही सगळ्या रिपोर्टरकडून मिळाली असल्याचेही आवर्जुन सांगते. 



सुजीत सिरकार यांच्या 'मद्रास कॅफे' मध्ये नरगिस फाकरीनेही पत्रकाराची भूमिका साकारली होती.मीडियावर  आपली भडास काढणाऱ्या दिग्दर्शकांना जेव्हा पत्रकारितेवर वर सिनेमा बनवण्याची संधी मिळते. तेव्हा मात्र निर्भिड पत्रकार रूपेरी पडद्यावर मांडण्याचा मोह बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांनाही आवरत नाही. येत्या वर्षात पत्रकारितेवर आधारित 'नूर' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.




सोनाक्षी सिन्हा पत्रकाराची भूमिका साकारत असलेला 'नूर' सिनेमाचे नुकतेच शूटिंग पूर्ण झाले आहे.या सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारताना फक्त मधूबाला यांनाच डोळ्यासमोर ठेवत ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने सांगितले. मधूबाला रूपेरी पडद्यावर पहिली अभिनेत्री आहेत ज्यांनी पत्रकार बनत रूपेरी पडद्यावर एंट्री मारली होती.त्यामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिके विषयी खूप गोष्टी ऐकल्या आहेत.यांतूनच खूप काही शिकायला मिळाले जे 'नूर' या सिनेमात मला फायदेशीर ठरले असल्याचेही सोनाक्षी सांगते.  

Web Title: Madhubala was the first Indian actress, who played the role of 'journalist' on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.