कुलभूषण जाधव प्रकरणी मधुर भंडारकर यांनी केले संतापजनक ट्विट !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 08:52 AM2017-12-28T08:52:53+5:302017-12-28T14:22:53+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या भूमिकेवर अतिशय संताप व्यक्त करणारे ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ...

Madhubur Jadhav case: Sandhya tweet made by Madhur Bhandarkar | कुलभूषण जाधव प्रकरणी मधुर भंडारकर यांनी केले संतापजनक ट्विट !!

कुलभूषण जाधव प्रकरणी मधुर भंडारकर यांनी केले संतापजनक ट्विट !!

googlenewsNext
लिवूड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानच्या भूमिकेवर अतिशय संताप व्यक्त करणारे ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांसह उदारमतवादी आणि चित्रपट उद्योगातील त्यांच्या सहकाºयांवर टीकेची तोफ डागली. त्यांनी ही शांतता भीती निर्माण करणारी असल्याचे म्हटले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘ज्या पद्धतीने पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला वागणूक दिली, ती प्रचंड संताप आणणारी आहे. मात्र त्याहीपेक्षा मानवाधिकार कार्यकर्ते, उदारमतवादी आणि चित्रपट जगतातील माझे सहकारी शांत आहेत, त्यावरून प्रचंड भीती वाटत आहे.’
 
दरम्यान, विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला दिलेल्या वागणुकीवर राज्यसभा आणि लोकसभेत आपले मत मांडले. त्यांनी म्हटले की, २५ डिसेंबर रोजी जाधव यांच्या परिवाराने त्यांची पाकिस्तानात भेट घेतली. ही भेट भारताने पाकिस्तानवर टाकलेल्या दबावानंतरच शक्य झाली. आम्ही जाधव प्रकरण आयसीजेपर्यंत घेऊन गेल्यानेच न्यायालयाने पाकिस्तानच्या निर्णयावर बंदी आणली. यावेळी सुषमा स्वराज यांनी हेदेखील स्पष्ट केले की, जाधवच्या परिवारासोबत पाकिस्तानने केलेले गैरवर्तन निषेधार्ह आहे. 

सूत्रांच्या मते, कुलभूषण जाधव इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलत होते. तसेच वारंवार सांगत होते की, ते भारतीय गुप्तहेर आहेत. ते बलुचिस्तानमधून स्वत:ला आॅपरेट करीत होते. शिवाय आंतकवादी कारवाया करण्यातही त्यांचा सहभाग होता. हेच आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर लावण्यात आले आहेत. मात्र, भारताकडून सुरुवातीपासूनच या आरोपांचे खंडन केले जात आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव आणि पत्नी चेतनकुल जाधव त्यांच्यासोबत मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु त्यांनी याबाबतचे कुठलेही उत्तर दिले नाही. या भेटीवरून सध्या भारतात पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. 

Web Title: Madhubur Jadhav case: Sandhya tweet made by Madhur Bhandarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.