पंडित जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचे निधन, ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:54 AM2024-09-25T10:54:56+5:302024-09-25T10:55:22+5:30
मधुरा जसराज या चित्रपती व्ही शांताराम यांच्या कन्या होत्या (madhura jasraj)
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. चित्रपती व्ही. शांताराम यांची मुलगी आणि पंडीत जसराज यांची पत्नी मधुरा जसराज यांचं दुःखद निधन झालंय. मधुरा यांची मुलगी दुर्गा यांनी आईच्या निधनाची दुःखद वार्ता प्रसारमाध्यमांना सांगितली आहे. मधुरा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालंय. गेल्या अनेक महिन्यांपासून मधुरा शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पंडीत जसराज आणि मधुरा यांचं जीवन
मधुरा आणि पंडीत जसराज यांनी १९६२ साली लग्न केलं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, ६ मार्च १९५४ रोजी मधुरा आणि पंडीत जसराज यांची पहिली भेट झाली. १९५४ साली मधुरा यांचे वडील आणि चित्रपती अशी ओळख असलेले महान दिग्दर्शक व्ही. शांताराम 'झनक झनक पायल बाजे' या सिनेमाची निर्मिती करत होते. मुलगी मधुरा वडील व्ही. शांताराम यांच्यासोबत भेटीचं नियोजन करेल, असं जसराज यांना सांगितलं होतं. या दरम्यान जसराज आणि मधुरा यांची ओळख वाढली आणि नंतर त्यांनी लग्न केलं. २०२० साली ९० व्या वर्षी पंडीत जसराज यांचं निधन झालं.
Madhura Jasraj, wife of late legendary classical vocalist Pandit Jasraj, passes away
— ANI Digital (@ani_digital) September 25, 2024
Read more @ANI Story | https://t.co/EN9DIlwgkk#MadhuraJasraj#PanditJasraj#Deathpic.twitter.com/LYuZDpt4Q5
मधुरा जसराज यांची मुलगी दुर्गा ही एक संगीतकार आणि अभिनेत्री आहे. त्यांचा मुलगा शारंग देव हा संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतो. जसराज कुटुंबाचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी अधिकृत नोट जारी करुन सांगितलंय की, दुपारी मधुरा यांचे पार्थिव अंधेरी येथील ओशिवरा स्मशानभूमीमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज बुधवार ४.४० दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.