'मी अशा पुरुषासोबत कधीच लग्न करु शकत नाही'; माधुरी- अनिल कपूर करत होते एकमेकांना डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:02 PM2021-12-24T13:02:03+5:302021-12-24T13:03:40+5:30

Anil kapoor: अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित यांनी जवळपास १२ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

madhuri dixit and anil kapoor alleged relationships and link ups | 'मी अशा पुरुषासोबत कधीच लग्न करु शकत नाही'; माधुरी- अनिल कपूर करत होते एकमेकांना डेट?

'मी अशा पुरुषासोबत कधीच लग्न करु शकत नाही'; माधुरी- अनिल कपूर करत होते एकमेकांना डेट?

googlenewsNext

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता म्हणजे अनिल कपूर (anil kapoor) . वयाची ६० पार केल्यानंतरही अनिल कपूरचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. बॉलिवूडमधील याच हॅण्डसम हंकचा आज ६५ वा वाढदिवस. २४ डिसेंबर १९५६ रोजी चेंबूरमध्ये जन्म झालेला हा अभिनेता आज बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यामध्येच अभिनेत्री माधुरी दिक्षित (madhuri dixit) आणि त्याच्या अफेअरच्या चर्चांना सध्या वेग आला आहे.
 
१९८० साली अनिल कपूरने 'वामसा वृक्षम' या तेलुगू चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'वो सात दिन' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटानंतर त्याचा बॉलिवूडमधील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. याच काळात त्याने अभिनेत्री माधुरी दिक्षितसोबत अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली. त्यामुळे या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडायची. मात्र, पडद्यावर झळकणारी ही जोडी त्याकाळी एकमेकांना डेट करत होती, असं म्हटलं जात होतं.

अफेअरच्या चर्चांवर माधुरीने सोडलं मौन

माधुरी आणि अनिल कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा वेग घेत असतांनाच माधुरीने एका मुलाखतीत याविषयी भाष्य केलं होतं. तसंच या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत असं स्पष्ट केलं होतं. "मी अशा पुरुषासोबत कधीच लग्न करु शकत नाही. तो प्रचंड भावूक आहे. आणि, मला माझा नवरा कूल हवाय. आता राहता राहिला प्रश्न अनिलसोबतच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तर, अनिलसोबत काम करताना मला कम्फर्टेबल वाटतं.  आणि हो, सेटवर सुद्धा आम्ही दोघं आमच्या अफेअरच्या चर्चांवर अनेक जोक करत असतो", असं माधुरी म्हणाली.
 

या कारणामुळे एकमेकांसोबत काम करणं केलं बंद

माधुरी आणि अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु, त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे त्यांनी एकमेकांसोबत काम करणं बंद केलं. या चर्चांमुळे अनिलच्या वैवाहिक जीवनात कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ नये यासाठी या दोघांनी एकत्र काम करण्याचं बंद केल्याचं म्हटलं जातं.

या चित्रपटात माधुरी- अनिल कपूरने केलं काम

अनिल आणि माधुरी या जोडीने 'तेजाब' (1988), 'राम लखन' (1989), 'किशन कन्हैया' (1990), 'बेटा' (1992) या सारख्या जवळपास १२ चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
 

Web Title: madhuri dixit and anil kapoor alleged relationships and link ups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.