माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:14 PM2023-02-22T14:14:06+5:302023-02-22T14:15:00+5:30

Madhuri Dixit : अनेकांना हे माहीत नाही की, माधुरी या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हती. त्यावेळच्या एका मोठ्या हिरोईनला हा रोल ऑफर झाला होता. माधुरीला हा सिनेमा योगायोगाने मिळाला.

Madhuri Dixit and Sanjay Dutt was not first choice for Saajan know the details | माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग...

माधुरी नव्हती ‘साजन’साठी पहिली पसंत, या अभिनेत्रीने साइन केला होता सिनेमा; शूटींगला गेली आणि मग...

googlenewsNext

Madhuri Dixit : 1991 मध्ये बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ‘साजन’ मधून माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी धमाका केला होता. 90च्या दशकातील या लव्हस्टोरीचं डायरेक्शन लॉरेंस डिसूजाने केलं होतं. नदीम श्रवणने संगीत दिलेली गाणी आणि माधुरीच्या अदांनी फॅन्सना वेड लागलं होतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, माधुरी या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हती. त्यावेळच्या एका मोठ्या हिरोईनला हा रोल ऑफर झाला होता. माधुरीला हा सिनेमा योगायोगाने मिळाला.

पूजा, अमन-आकाशच्या लव्हच्या ट्राएंगल बनलेला ‘साजन’ सिनेमा फारच गाजला होता. पूजाची भूमिका माधुरीने साकारली होती. पण ही भूमिका आधी फेमस हिरोईन आयशा जुल्काला मिळाली होती. आयशा त्या दिवसात ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाड़ी’ आणि ‘हिम्मतवाला’ सारख्या सिनेमामुळे गाजत होती. आयशाने हा सिनेमा साइनही केला आणि सिनेमाच्या सेटवरही गेली होती.

आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, आयशा जुल्का साजन सिनेमाची शूटींग सुरू केली होती. पण सेटवरच तिची तब्येत बिघडली. तिची तब्येत इतकी बिघडली की, शूटींग पुढे सुरू ठेवणं अवघड झालं होतं. आयशाची तब्येत बघता मेकर्सनी माधुरी दीक्षितला ही भूमिका दिली. त्यानंतर माधुरी यशाच्या शिखरावर पोहोचली.

तेच आयशा जुल्कासोबत आमिर खानची जोडी बनवण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, आमिरला सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नव्हती. त्याला भूमिकाही आवडली नव्हती. त्यामुळे त्याने सिनेमा सोडला. त्याच्याजागी संजय दत्तला भूमिका देण्यात आली.

आयशा जुल्काच्या तुलनेत माधुरीचं करिअर या सिनेमामुळे खूप पुढे गेलं. या सिनेमातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली. नदीम श्रवण यांना बेस्ट म्यूजिक डायरेक्टरचा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता. तर कुमार सानू यांना ‘मेरा दिल भी कितना पागल है’ गाण्यासाठी अवॉर्ड मिळाला होता.

Web Title: Madhuri Dixit and Sanjay Dutt was not first choice for Saajan know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.