माधुरी दीक्षितने घेतली swanky Ferrari, 'या' लक्झरी कारची किंमत माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:23 IST2025-01-14T13:22:10+5:302025-01-14T13:23:14+5:30
मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर माधुरीने लक्झरी कार खरेदी केली आहे.

माधुरी दीक्षितने घेतली swanky Ferrari, 'या' लक्झरी कारची किंमत माहितीये का?
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) 'धकधक गर्ल' म्हणून लोकप्रिय आहे. ९० च्या दशकात तिच्या अदाकारीने तिने सर्वांनाच घायाळ केलं. लग्नानंतर माधुरी अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होती. मात्र आता ती कुटुंबासोबत मुंबईतच असून पुन्हा सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे. आज मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर माधुरीने लक्झरी कार खरेदी केली आहे.
Carwale वेबसाईटनुसार, माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी नुकतीच Ferrari 296 GTS खरेदी केली आहे. याची किंमतच तब्बल ६ कोटी रुपये आहे. काल १३ जानेवारी रोजी दोघंही लाल रंगाच्या फेरारीमध्ये दिसले. त्यांची फेरारी बघून लोक दंग झाले. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर केलं. माधुरी शिमरी गाऊनमध्ये दिसली तर डॉ नेनेंनी काळ्या रंगाचा सूट घातला होता. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
माधुरीकडे अगोदरच मर्सिडीज मेबैक एस 560 आहे ज्याची किंमत २.५ कोटी रुपये आहे. याशिवाय मर्सिडीज एस क्लास 450, स्कोडा ऑक्टेविया वीआरएस, इनोवा क्रिस्टा, रेंज रोवर वोग या लक्झरी कारही आहे. तसंच काही स्पोर्ट्स कारही आहेत. डॉ नेने कारचे शॉकिन आहेत.
५७ वर्षीय माधुरीला २१ वर्षीय अरीन आणि १९ वर्षीय रायन ही दोन मुलंही आहेत. माधुरी नुकतीच 'भूल भुलैय्या ३' मध्ये दिसली.