'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:45 AM2024-09-11T11:45:31+5:302024-09-11T11:46:34+5:30

एका मुललाखतीत माधुरीने यावर स्पष्टीकरण दिलं होतं.

Madhuri Dixit charged five times higher fees than salman khan for hum aapke hai kaun | 'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली...

'हम आपके है कौन' साठी माधुरीला सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन मिळालं? म्हणाली...

१९९४ साली आलेला 'हम आपके है कौन' ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाची क्रेझ आजही तितकीच आहे. राजश्री निर्मित या सिनेमात कलाकारांची मांदियाळीच होती. सलमान खान आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  यांची सिनेमात मुख्य भूमिका होती. माधुरी तेव्हा स्टार अभिनेत्री होती. दरम्यान या सिनेमासाठी माधुरीने सलमानपेक्षा पाचपट जास्त मानधन घेतल्याचीही चर्चा झाली. एका मुलाखतीत माधुरीने यावर भाष्य केलं होतं.

सूरज बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन' हा त्यावेळचा सर्वात गाजलेला सिनेमा. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. सलमान खान, माधुरी दीक्षित, आलोक नाथ, रेणुका शहाणे, रिमा लागू, मोहनीश बहल, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे यांची सिनेमात भूमिका होती. सिनेमातील गाणी तर अजरामर झाली. त्यावेळी माधुरी आधीच स्टार अभिनेत्री होती. तर सलमान खान तसा नवीन होता. दरम्यान या सिनेमासाठी माधुरीने किती मानधन घेतलं याची नंतर खूप चर्चा झाली. माध्यम रिपोर्टनुसार, सलमान खानपेक्षा माधुरी पाचपट जास्त म्हणजेच २.७ कोटी रुपये मानधन आकारलं होतं.


एका मुलाखतीत माधुरी या चर्चांवर म्हणाली होती की, "या चर्चा कुठून सुरु झाल्या मला माहित नाही. आम्ही सिनेमा साईन करतो तेव्हा हिरो किती फीस घेतोय हे आम्ही विचारत नाही. आम्ही फक्त स्वत:ची बाजू ठेवतो. स्वत:ची किंमत आम्ही स्वत:च ठरवतो. कोणाशी तुलना करुन ठरवत नाही. त्यामुळे इतरांना किती फीस मिळते हे मला माहित नसतं. हम आपके है कौन वेळी सगळ्यात जास्त कमाई राजश्रीने केली होती. पण मला इतर स्टारकास्टने किती फीस घेतली हे माहित नाही. मला माझी भूमिका आवडली होती म्हणून मी सिनेमा केला."

 

Web Title: Madhuri Dixit charged five times higher fees than salman khan for hum aapke hai kaun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.