आईच्या निधनानंतर माधुरीची भावूक पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली, 'आता आईची खोली...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:21 AM2023-03-13T11:21:17+5:302023-03-13T12:09:54+5:30

आज सकाळीच माधुरीने पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली.

Madhuri dixit emotional post after her mother snehalata dixit death says she taught us many things | आईच्या निधनानंतर माधुरीची भावूक पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली, 'आता आईची खोली...'

आईच्या निधनानंतर माधुरीची भावूक पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली, 'आता आईची खोली...'

googlenewsNext

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित (Snehalata Dixit) यांचं काल निधन झालं. 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधुरी आईच्या किती जवळ होती हे वेळोवेळी तिच्या फोटोंमधून दिसले आहे. काल संध्याकाळी वरळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आज सकाळीच माधुरीने पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली.

'धकधक गर्ल' माधुरी च्या नृत्याने सगळ्यांनाच प्रेमात पाडले. खरंतर तिच्या आईला नृत्याची प्रचंड आवड होती मात्र परिस्थितीमुळे त्या शिकू शकल्या नाहीत. त्यांनी आपलं हेच स्वप्न मुलीमध्ये पाहिलं आणि माधुरीने ते पूर्णही केलं. आज आई आपल्यात नाही म्हणल्यावर माधुरी दु:खी झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर आईसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'आज सकाळी उठले आणि आईची खोली रिकामी होती. फार विचित्र वाटते. तिने आम्हाला आयुष्य जगायला आणि साजरं करायला शिकवलं. ती नेहमी इतरांसाठी जगली. आम्हाला नेहमीच तिची आठवण येत राहील. आई नेहमीच आमच्या स्मरणात राहील. तिच्यात बुद्धीचातुर्य,सकारात्मकता आणि एक आकर्षित करणारी शक्ती होती. तिच्या आठवणींच्या माध्यमातून आम्ही आयुष्य साजरं करत राहू. ओम शांती ओम.'

माधुरीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीही व्यक्त झाले आहेत. दिया मिर्झा, रवीना टंडन, अल्का याज्ञिक, चित्रांगदा, नीलम कोठारी या कलाकारांनी माधुरीला धीर दिला आहे. काल संध्याकाळी आईच्या अंत्यसंस्काराला जाताना माधुरी भावूक झाली होती. तिच्यासोबत पती श्रीराम नेने देखील होते. 

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक, लेकीने आईचं 'हे' स्वप्न केलं होतं पूर्ण

माधुरीला भारती आडकर, रुपा दांडेकर या दोन बहिणी आणि अजीत दीक्षित हा भाऊ आहे. स्नेहलता यांचा जन्म १९३२ मध्ये झाला होता. त्यांचं लग्न शंकर दीक्षित यांच्यासोबत झालं होतं.२०१३ मध्ये शंकर दीक्षित म्हणजे माधुरीच्या वडिलांचं निधन झालं. आता माधुरीच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं आहे.

Web Title: Madhuri dixit emotional post after her mother snehalata dixit death says she taught us many things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.