माधुरी दीक्षितला उशिरा जाग आली अन् ट्रोल झाली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:20 PM2019-12-20T12:20:10+5:302019-12-20T12:26:32+5:30
डॉ. श्रीराम लागूंच्या निधनावर शोक व्यक्त करत, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही एक ट्विट केले. पण या ट्विटनंतर लगेच ती ट्रोल झाली.
अनेक भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्याच्या निधनानंतर कलाविश्वातीलच नव्हे तर राजकारण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लागूंच्या निधनावर शोक व्यक्त केला. डॉ. श्रीराम लागूंच्या निधनावर शोक व्यक्त करत, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही एक ट्विट केले. पण या ट्विटनंतर लगेच ती ट्रोल झाली. होय, कारण माधुरीला जरा उशिरा जाग आली. मग काय, सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर टीका सुरु केली.
Just heard about the sad demise of legendary actor #ShreeramLagoo ji. May his soul rest in peace.
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) December 19, 2019
लागूंच्या निधनानंतर दोन दिवसांनी माधुरीने ट्विट केले. ‘दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल आत्ताच ऐकले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ,’असे माधुरीने गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले. माधुरीला दोन दिवसानंतर जाग आलेली पाहून काही युजर्सनी तिला फैलावर घेतले.
U r very slow mam
— Karan Kumar Yadav (@iamkaranaarav01) December 19, 2019
Bohat Jaldi Pata Chala Mam Aap ko
— SABAHAT SHAIKH (@SABAHATSHAIKH7) December 20, 2019
तुम्ही फारच स्लो आहात मॅम, अशी खोचक कमेंट एका युजरने केली. तर अन्य का युजरने, तीन दिवसानंतर समजले का? असा सवाल माधुरीला केला. तीन दिन बाद, असे लिहित एका युजरने माधुरीला ट्रोल केले.
झोपेत होती वाटतं. उशिरा जाग आली.
— Vikas Jadhav (@vikasjadhav4545) December 20, 2019
3 din baad?.
— I A K (@its_IAK) December 19, 2019
डॉ. लागू यांनी 17 डिसेंबरला अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांनी शंभरहून अधिक हिंदी सिनेमात आणि ४० हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केले. २० हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केले. मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमी त्यांनी गाजवली.