लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती माधुरी दीक्षित, या मोठ्या कारणामुळे परतावे लागले भारतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:31 PM2022-03-14T16:31:16+5:302022-03-14T16:31:36+5:30

Madhuri Dixit: जवळपास १२ वर्ष माधुरी दीक्षित लग्नानंतर कुटुंबासोबत अमेरिकेत वास्तव्यास होती.

Madhuri Dixit had settled in the US after her marriage and had to return to India for a big reason | लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती माधुरी दीक्षित, या मोठ्या कारणामुळे परतावे लागले भारतात

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली होती माधुरी दीक्षित, या मोठ्या कारणामुळे परतावे लागले भारतात

googlenewsNext

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ती नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली. पण ती बॉलिवूडपासून कायमची दुरावली. 
एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितने सांगितले की तिच्यासाठी हा बदल खूप मोठा होता. अचानक संसाराची जबाबदारी पडली आणि ती देखील दुसऱ्या देशात.
ही तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. 

माधुरी म्हणाली की, दुसऱ्या देशात राहणे ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नाही. त्यात तुम्ही लग्न करून जाता तर अजिबात सोप्पे नसते. इथे भारतात सतत माझ्यासोबत कोणी ना कोणी असायचे. त्यामुळे मला खूप सुरक्षित वाटायचे. मात्र परदेशात मला स्वत:च्या गोष्टी स्वत: करणे, अनेक निर्णय स्वत:च घेणे यांसारख्या गोष्टी करावी लागल्या. पण यामुळे ती स्वावलंबी झाली याचा तिला अभिमान वाटतो.

अमेरिकेत राहत असताना एक गोष्ट माधुरीला स्वस्थ बसू देत नव्हती. ती गोष्ट म्हणजे अभिनय. अभिनयापासून बरेच वर्षे दुरावलेल्या माधुरीने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तिने श्रीराम नेनेंसाठी करिअर सोडले होते. परंतु लग्नानंतर श्रीराम नेने सुद्धा केवळ माधुरीसाठी तिच्यासोबत भारतात परतले आणि ​इथेच स्थायिक झाले. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात कार्यरत आहेत. माधुरीने २००७ मध्ये आ जा नचले शोमधून सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले.

Web Title: Madhuri Dixit had settled in the US after her marriage and had to return to India for a big reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.