माधुरी दीक्षितने मुंबईत घेतले ५५०० स्क्वेअर फिटचं आलिशान घर, तिच्या घराची झलक पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:04 PM2022-03-22T13:04:56+5:302022-03-22T13:05:33+5:30
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने मुंबईतील वरळी येथे २९व्या मजल्यावर नवीन अपार्टमेंट घेतले. तिच्या या आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ची नुकतीच 'द फेम गेम' (The Fame Game) ही वेबसीरिज रिलीज झाली. या वेबसीरिजमधील तिच्या कामाचे सर्वत्र खूप प्रशंसा होत आहे. दरम्यान असे समजते आहे की, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी नुकतेच मुंबईतील वरळी येथे घर विकत घेतले आहे. हे घर ५५०० स्क्वेअर फिटचे असून खूपच आलिशान आहे.
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी १२.५ लाख रुपये प्रति महिना भाड्याने भाडेतत्त्वावर एक मोठा अपार्टमेंट घेतला असल्याची माहिती मिळते आहे. हे अपार्टमेंट २९ व्या मजल्यावर असून ५५०० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. त्यांनी ४५ दिवसांत जागेचे नूतनीकरण केले आहे. अपार्टमेंट इंटिरियर डिझायनर अपूर्व श्रॉफ यांनी 'पिंकविला'ला माधुरी दीक्षित आणि डॉ श्रीराम नेने यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला आश्चर्य वाटले की ते किती डाउन टू अर्थ आहेत आणि त्यांच्या विनंत्या किती व्यावहारिक होत्या. त्यांची फक्त कालावधीची अट होती. वेळेसोबत आणखी एक आव्हान होते ते रंंगांसोबत एक्सपेरिमेंटसाठी त्यांना तयार करणे.
त्यांनी संपूर्ण डिझाइनचे नियोजन कसे केले आणि ते तयार करताना त्यांनी काय लक्षात ठेवले असे विचारले असता, डिझायनरने सांगितले की स्टार जोडप्याला त्यांच्या अपार्टमेंटचा छान, साधा आणि द्रुत मेकओव्हर हवा आहे.
ते म्हणाले, "वरळी येथील २९व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये रात्रीच्या वेळी खाली पाहताना झगमगाट असलेल्या शहराचा शानदार नजारा पाहायला मिळतो आणि दिवसादेखील घर प्रकाशमान असते."
डिझायनर अपूर्वाने सांगितले की, स्टार जोडप्याची भव्यता, अष्टपैलुत्व आणि ग्लॅमर त्यांच्या घरात प्रतिबिंबित करणे हे मुख्य ध्येय होते, जेणेकरून ते त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करेल.