अनिल कपूरमुळेच माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चनसोबत कधीही केले नाही काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 11:18 AM2017-08-27T11:18:45+5:302017-08-27T16:48:45+5:30
बॉलिवूडमध्ये कदाचित अशी एकही अभिनेत्री नसेल की, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची तिला इच्छा नसेल. भलेही आज अमिताभ ...
ब लिवूडमध्ये कदाचित अशी एकही अभिनेत्री नसेल की, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची तिला इच्छा नसेल. भलेही आज अमिताभ यांचे वय वाढले असले तरी, त्यांच्यासोबत काम करण्यास इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री आजही काम करण्यास उत्सुक आहे. मात्र ८० आणि ९०च्या दशकाचा विचार केल्यास अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट सुपरहिट होऊनही एक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास अजिबात उत्सुक नव्हती. वास्तविक अमिताभच्या अपोझिट अनेक चित्रपटांमध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिला संधी मिळाली होती. परंतु तिने प्रत्येक आॅफरला स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
वास्तविक त्याकाळा अॅँग्री यंग मॅन म्हणून अमिताभ यांना ओळखले जात होते. त्यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेत्री तेव्हाही उत्सुक होती. परंतु माधुरी यास अपवाद होती. मात्र माधुरीने असा पवित्रा का घेतला असावा? याचा जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा त्यामागे अनिल कपूर हे कारण असल्याचे समोर आले. त्याकाळी अनिल कपूरला अमिताभ बच्चन यांचा कट्टर प्रतिद्वंदी समजले जायचे. अशात माधुरीने त्यांच्यासोबत काम करावे यास अनिल कपूरचा तीव्र विरोध होता. अशातही एकदा डेविड धवन या दोघांना पडद्यावर आणण्यास यशस्वी झाले होते. ‘बडे मियां-छोटे मियां’ या चित्रपटात माधुरी आणि अमिताभ यांनी एका गाण्यात एकत्र काम केले. परंतु ती भूमिका खूपच लहान होती.
आता तुम्ही म्हणाल की, माधुरीने अनिल कपूरचे म्हणणे ऐकण्याचे काय कारण? तर त्यामागचे कारण असे की, ज्यावेळी माधुरी बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करीत होती, त्याकाळी अनिल कपूरने तिला साथ दिली होती. अनिलबरोबर त्यावेळी तिने ‘तेजाब, राम-लखन, किशन-कन्हैया, बेटा, पुकार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर या चित्रपटांनी तिला इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळखही निर्माण करून दिली. याच कारणामुळे माधुरी अनिल कपूरला तिच्या आयुष्यात नेहमीच स्पेशल समजत आली आहे. शिवाय त्याच्याविरोधात जाण्याचे तिने कधी धाडसही केले नाही.
त्याकाळी तर अनिल कपूर आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. एका पाठोपाठ एक चित्रपटांमध्ये हे दोघे झळकू लागल्याने त्यांच्यात जवळीकता निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र दोघांनीही या चर्चांचा कधीही जाहीरपणे स्वीकार केला नाही. इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कलाकार एकमेकांची मदत करीत असतात, याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी असायला हवे असा होत नसल्याचा खुलासा अनिल कपूर याने केला होता. परंतु बॉलिवूडच्या शहेंशाहसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली नाही, याची खंत तिला नेहमीच वाटेल यात शंका नाही.