'प्रिय आई तुला गमावण्याचं दु:ख...', माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 04:41 PM2024-03-12T16:41:31+5:302024-03-12T16:43:23+5:30

माधुरी आईची अत्यंत लाडकी होती.

Madhuri Dixit pens an emotional note on her mother's Snehlata Dixit death anniversary | 'प्रिय आई तुला गमावण्याचं दु:ख...', माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

'प्रिय आई तुला गमावण्याचं दु:ख...', माधुरी दीक्षितची भावुक पोस्ट; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

प्रत्येक मुलीसाठी तिची आई खास मैत्रिण असते. आयुष्यात एक काळ असा येतो, जेव्हा प्रत्येक ठिकाणी आईची गरज भासते. अभिनेत्री माधुरी दीक्षित ही देखील आई स्नेहलता दीक्षित यांच्या फार जवळ होती. मध्यमवर्गीय मराठी वातावरणात वाढलेल्या माधुरीला बॉलिवूड मध्ये करियर करणं केवळ आईमुळे शक्य झालं नुकतेच माधुरीने आईसोबत खास फोटो शेअर करत आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र माधुरीने आईसाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे. 

माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी गेल्यावर्षी  १२ मार्च २०२३  राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला होता. माधुरी आईची अत्यंत लाडकी होती. माधुरीच्या करियरमध्ये तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. आज आईच्या निधनाला १ वर्ष पुर्ण होताच माधुरीने पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, 'आई तुला जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. तुझा आशिर्वाद आणि प्रेम दररोज प्रेरणा देतं. तुला गमावण्याचं दुःख असून तुझी आठवण कायम येते. आमचं सर्वांचं तुझ्यावर मनापासून प्रेम असून प्रत्येक क्षणाला तुझा सहवास आम्हाला जाणवत राहतो', या शब्दात माधुरीने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित सध्या सतत चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच माधुरी तिच्या कुटुंबासह अमेरिकेतून पुन्हा भारतात स्थायिक झाली आहे. भारतात आल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीतही कमबॅक केलं आहे. माधुरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माधुरी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियीवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 
 

Web Title: Madhuri Dixit pens an emotional note on her mother's Snehlata Dixit death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.