माधुरी दीक्षितने भाडेतत्त्वावर दिलं ऑफिस; भाडं इतकं की वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:06 IST2024-12-17T17:05:39+5:302024-12-17T17:06:12+5:30
माधुरी दीक्षित हिने आपल्या मालकीचे मुंबईतील कार्यालय एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिलं आहे.

माधुरी दीक्षितने भाडेतत्त्वावर दिलं ऑफिस; भाडं इतकं की वाचून थक्क व्हाल!
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील एक प्रख्यात अभिनेत्री आणि अप्रतिम सौंदर्यवती आहे. आपल्या सौंदर्याने, अभिनय कौशल्याने आणि अदाकारीने ती प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. आज ती सिनेसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिच्याबाबतीत जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या अभिनेत्री एका व्यवहारामुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीनं लग्झरी ऑफिस भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी दीक्षितने अंधेरी पश्चिममधील मालमत्ता भाड्याने दिली आहे. पहिल्या वर्षाचे भाडे 3 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे आणि त्यानंतर हे भाडे 3 लाख 15 हजार रुपये होणार आहे. यासाठी तिला 3 लाख रुपयांचे मासिक भाडे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. माधुरीचे हे कार्यालय असून ते 1 हजार 594.24 चौरस फूटांत पसरले आहे.
याशिवाय, माधुरीने नुकतेच मुंबईतील लोअर बरेल भागात एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटची किंमत सुमारे 48 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. माधुरीचे हे अपार्टमेंट 53 व्या मजल्यावर असून, ते 5 हजार 384 चौरस फूट आहे. या अपार्टमेंटमध्ये सात मोटारी पार्किंग केल्या जाऊ शकतात. यंदा अनेक बॉलिवूड कलाकारांनी मुंबईत मालमत्ता खरेदी केल्या आहेत. बॉलिवूड स्टार्स हे देशातील मोठ्या शहरातील उच्चभ्रू भागांत आलिशान घरे, फ्लॅट किंवा व्यावसायिक मालमत्तांची खरेदी करतात. त्यातूनही त्यांची मोठी कमाई होत असते.