"असा एकही दिवस गेला नाही की..." माधुरी दीक्षितची आईसाठी खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:57 IST2025-03-13T09:57:00+5:302025-03-13T09:57:16+5:30

आईच्या आठवणीत माधुरी दीक्षित, जुन्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली...

Madhuri Dixit Shared An Emotional Post In Memory Of Her Mother | "असा एकही दिवस गेला नाही की..." माधुरी दीक्षितची आईसाठी खास पोस्ट, म्हणाली...

"असा एकही दिवस गेला नाही की..." माधुरी दीक्षितची आईसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Madhuri Dixit:  बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करतेय. माधुरीचे लाखो चाहते असून तिच्या हास्यावर कित्येक जण फिदा आहे. माधुरीचा सोशल मीडियातील वावरही मोठा आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना कायम ती आयुष्यातील अपडेट देत असते. आताही तिच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. माधुरी दीक्षितनं इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहली आहे. 

माधुरीनं सोशल मीडियावर आईसाठी पोस्ट शेअर केली आहे. तिनं आईचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. "गेली दोन वर्षं तुझ्याशिवाय गेली आणि या दोन वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मला तुझी आठवण आली नाही. तुझं प्रेम, तुझं शहाणपण आणि तुझं अस्तित्व मला प्रत्येक क्षणाला जाणवतं. आई, तू कायम माझ्या हृदयात आहेस", या शब्दात माधुरीनं आईवरचं प्रेम व्यक्त केलं. 


माधुरी दीक्षितची आई (Madhuri Dixit Mother) स्नेहलता दीक्षित यांचं १२ मार्च २०२३ रोजी मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या माधुरीनं बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. पण, तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. पण, या प्रवासात तिला कायम तिच्या आईची साथ लाभली.  

दरम्यान, माधुरी मध्यंतरी काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. काही वर्षांनी तिने पुन्हा एकदा इंडस्ट्रीत पुनरागमन केले. माधुरी फारशा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरीही रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून किंवा पाहुणे म्हणून ती सतत दिसत असते. सध्या निर्मिती क्षेत्रात देखील उतरली आहे. तिने आपला पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत मिळून मराठी सिनेमा 'पंचक'ची निर्मिती केली आहे.  अशातच माधुरीनं 'स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२५' ला हजेरी लावली होती. येत्या १६ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. 
 

Web Title: Madhuri Dixit Shared An Emotional Post In Memory Of Her Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.