Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा मुलगा अरिनचा झाला मेकओव्हर; दिसतो हँडसम, "फॅन्स म्हणतात, हा तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:19 IST2023-02-17T14:13:49+5:302023-02-17T14:19:40+5:30
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना अरिन आणि रयान नावाचे दोन मुलगे आहेत, जे आता हँडसम कूल ड्यूड्स बनले आहेत.

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा मुलगा अरिनचा झाला मेकओव्हर; दिसतो हँडसम, "फॅन्स म्हणतात, हा तर..."
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट डान्सर यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा माधुरी दीक्षितचे नाव सर्वात आधी येतं. ९० च्या दशकात चित्रपटाची नायिका म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीच्या सौंदर्याचे आणि तिच्या स्टाईलचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. वयाच्या ५३ व्या वर्षीही माधुरी तितकीच सुंदर दिसते. माधुरीकडे पाहून कोणीही सांगू शकणार नाही की ती दोन मोठ्या मुलांची आई आहे.
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना अरिन आणि रयान नावाचे दोन मुलगे आहेत, जे आता हँडसम कूल ड्यूड्स बनले आहेत. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकत्याच एका YouTube व्हिडिओमध्ये त्यांची सेलिब्रिटी पत्नी आणि मुलगा अरिन यांच्यासोबत अमेरिकेत राहण्याचा अनुभव सांगितला. अरिन सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये शिकत आहे.
अरिनच्या लूकने याच दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये अरिनला पाहून त्याने त्याच्या लूकवर एक्सपेरिमेंट केल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओतील त्याचा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. अरिनचा नवा कूल लुक आणि त्याचा मेकओव्हर पाहून चाहतेही खूश झाले. काही लोकांनी सांगितले की अरिन हिरो मटेरिअलसारखा दिसत आहे.
काहींनी सांगितले की अरिन हुबेहुब तरुण संजय दत्तसारखा दिसत आहे. यूट्यूब व्हिडिओमध्ये अरिन शेअर करताना दिसला की त्याचे विद्यापीठ सुरक्षित ठिकाणी आहे. रात्री एकटे फिरायला आवडत नाही असेही त्याने सांगितले. अरिनने शेअर केले की, जर त्याला रात्री उशीरा बाहेर जावे लागले तर तो फक्त त्याच्या मित्रांसोबत जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"