माधुरी दीक्षितला कुणी रिजेक्ट करेल का? पण दूरदर्शनने केले; सीरियल बनून तयार होती परंतु...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 18:58 IST2021-06-16T18:07:08+5:302021-06-16T18:58:21+5:30
Madhuri Dixit : किस्सा आहे 1984 सालचा. माधुरी नवखी होती. संधीच्या शोधात होती. अशात तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली...

माधुरी दीक्षितला कुणी रिजेक्ट करेल का? पण दूरदर्शनने केले; सीरियल बनून तयार होती परंतु...
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit ) कुणी रिजेक्ट करेन का? पण दूरदर्शनने चक्क माधुरीलाही रिजेक्ट केले होते. होय, याबद्दलचा एक किस्सा भारी इंटरेस्टिंग आहे.
किस्सा आहे 1984 सालचा. माधुरी नवखी होती. संधीच्या शोधात होती. अशात तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेचे नाव होते ‘बॉम्बे मेरी है’. (Bombay Meri Hai)
माधुरी आणि तिच्यासोबत बेंजामिन गिलानी मालिकेत लीड रोलमध्ये होते. माधुरी एक गृहिणी असते आणि तिचा नवरा एक स्क्रिप्ट रायटर असतो. लग्नानंतर हे जोडप एका चाळीत शिफ्ट होते आणि बाईचा नवरा स्क्रिप्ट राईटर आहे हे कळताच, लोकांची त्याला भेटण्यासाठी झुंबड उडते. चित्रपटात हिरो कोण? असे एक ना अनेक भलते भलते प्रश्न घेऊन चाळीतील लोक या जोडप्याला हैराण करतात, अशी या मालिकेची ढोबळ कथा होती.
ही मालिका दूरदर्शनवर टेलिकास्ट होणार होती. मालिकेचे पायलट एपिसोडही बनून तयार होते. पण प्रत्यक्षात माधुरीची ही मालिका कधी टेलिकास्ट झालीच नाही. कारण काय तर दूरदर्शनने (Doordarshan) ही मालिकाच नाकारली.
होय,शोच्या कास्टमध्ये काहीही दम नाही, नवख्या कलाकारांना कोण बघणार, असे म्हणून दूरदर्शनने ही मालिका नाकारली होती. साहजिकच या मालिकेतून डेब्यू करण्याचे माधुरीचे स्वप्नही भंगले होते. पण तात्पुरतेच.
कारण ज्यावर्षी दूरदर्शनने माधुरीची मालिका रिजेक्ट केली, त्याचवर्षी माधुरीने ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. हा सिनेमा आपटला. यानंतरचे आणखी काही सिनेमेही आपटले आणि मग 1988 साली आलेल्या ‘तेजाब’ या सिनेमाने कमाल केली. या सिनेमातून माधुरीने असे काही कमबॅक केले की, निर्माते यानंतर तिचे उंबरठे झिजवू लागलेत. यानंतर माधुरीने कधीच मागे वळून पाहिले नाही.