‘हम आपके हैं कौन’साठी सलमानपेक्षाही जास्त माधुरीने घेतलं होतं मानधन, रक्कम वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:44 PM2023-03-25T12:44:06+5:302023-03-25T12:45:24+5:30
Madhuri Dixit : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या सिनेमासाठी माधुरी ही पहिली पसंत नव्हती. माधुरीआधी निकी जी तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री होती तिला हा रोल ऑफर करण्यात आला होता.
‘हम आपके हैं कौन’ (Hum Aapke Hain Koun) सूरज बड़जात्या यांच्या या रोमॅंटिक आणि कौटुंबिक सिनेमाला रिलीज होऊन 29 वर्ष झाले आहेत. हा सिनेमा आजही लोकांना तेवढाच आवडतो जेवढा आधी आवडायचा. सलमान खान आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात मोहनीश बहल, आलोक नाथ, रेणुका शहाणे, अनुपम खेर आणि रीमा लागू यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या सिनेमासाठी माधुरी ही पहिली पसंत नव्हती. माधुरीआधी निकी जी तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री होती तिला हा रोल ऑफर करण्यात आला होता. पण नंतर माधुरीकडे ही भूमिका आली आणि ती तिने यादगार केली. पण या रोलसाठी तिने मोठी रक्कम घेतली.
IMDB च्या एका रिपोर्टनुसार, ‘हम आपके हैं कौन’ सिनेमातील निशाच्या भूमिकेसाठी निकी अनेजा (Niki Aneja) ही डायरेक्टरची पहिली पसंत होती. ती सलमानसोबत फायनल झाली होती. सूरज बडजात्या यांना या सिनेमासाठी निकी अनेजा हिलाच घ्यायचं होतं. पण काही कारणांनी निकी या सिनेमात काम करू शकली नाही. मग ही भूमिका माधुरीकडे आली.
तुम्हाला माहीत नसेल पण, या सिनेमातील निशाची भूमिका साकारण्यासाठी माधुरीने सलमान खानपेक्षाही जास्त मानधन घेऊन सगळ्यांना हैराण केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, माधुरीने या सिनेमासाठी सगळ्या कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. तिने या सिनेमासाठी त्यावेळी 2.7 कोटी रूपये मानधन घेतलं होतं. ही त्यावेळी एका अभिनेत्रीला मिळालेलं सगळ्यात जास्त मानधन होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाच्या टायटलवरून फार वाद-विवाद झाला होता. सिनेमाचं शूटींग चार वर्ष चाललं. तरीही सिनेमाचं टायटल फायनल झालं नव्हतं. सिनेमाचं टायटल अनेक लोक फायनल करत होते. पण डायरेक्टरला ते आवडत नव्हतं.
IMDB च्या रिपोर्टनुसार, सूरज बडजात्या यांचे आजोबा आणि कंपनीचे संस्थापक ताराचंद बड़जात्या यांना सिनेमातील गाणं ‘धिकताना’ फार आवडलं होतं आणि त्यांना हेच टायटल द्यायचं होतं. नंतर त्यांना ‘हम आपके हैं कौन’ टायटलला होकार दिला. मग हेच फायनल झालं.