म्हणून लग्नानंतर तब्बल 12 वर्षे प्रेग्नेंसीपासून दूरच राहिली ही अभिनेत्री, सांगितले त्या मागचे हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:47 PM2019-09-19T16:47:30+5:302019-09-19T16:57:05+5:30
ही अभिनेत्री झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.
ही अभिनेत्री झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करत असते. आम्ही बोलतोय अभिनेत्री मंदिरा बेदीबद्दल. मंदिरा सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याचदा मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होते. दिलेल्या एका मुलाखतीत मंदिरानं ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं की, लोकांचं ट्रोल करणं हरॅसमेंटसारखे वाटते. तरीदेखील ट्रोलर्सकडे लक्ष न देता वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत असते.
आजतकच्या रिपोर्टनुसार मंदिराने दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. मंदिराने सांगितले की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे ती आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती.
मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपले. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. नुकतीच मंदिरा प्रभासच्या साहोमध्ये दिसली होती. यात तिने नेगेटीव्ह शेड् होती.