गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:12 IST2025-02-11T11:09:39+5:302025-02-11T11:12:14+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

maha kumbh 2025 bollywood actress sonal chauhan reached prayagraj takes holy dip shared photo | गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

Maha Kumbh 2025:  प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याचा (Maha Kumbh 2025) शुभारंभ झाला आहे. या महकुंभमेळ्याला जगभरातून भाविक हजेरी लावत आहेत. महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या पवित्र कुंभमेळ्यात सामान्य माणसांपासून कोट्यवधी भाविकांसह, बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होत आहेत. आता या यादीत अभिनेत्री सोनल चौहानचं नाव सामील झालं आहे. दरम्यान, नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहाने (Sonal Chauhan) या महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात प्रवित्र स्नान केलं आहे.


'जन्नत' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली नायिका म्हणजे सोनल चौहान. या पहिल्याच सुपरहिट सिनेमातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच महाकुंभ मेळ्याला भेट दिली. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने महाकुंभ मेळ्याचा अनुभव शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती पवित्र स्नान करताना पाहायला मिळत आहे. "त्रिवेणीं माधवं सोमं भरद्वाजं च वासुकिम् । वन्देऽक्षयवटं शेषं प्रयागं तीर्थनायकम्..." असं कॅप्शन देत सोनलने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


त्याचबरोबर अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय, "महाकुंभमेळ्यात पूज्य स्वामी कैलाश नंदगिरी जी महाराज यांची भेट घेण्याचा योग आला व त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्याचे सुंदर शब्द कानावर पडताच मनात एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली."

वर्कफ्रंट

सोनल चौहानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल तर तिने जन्नत चित्रपटाव्यतिरिक्त तिने 'बुढ्ढा होगा तेरी बाप', '३ जी' या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. चित्रपटांमध्ये सोनलला अपयश मिळालं असलं तरी मॉडलिंगमध्ये मात्र सध्या ती यशाच्या शिखरावर आहे

Web Title: maha kumbh 2025 bollywood actress sonal chauhan reached prayagraj takes holy dip shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.