महाकुंभच्या व्हायरल गर्ल मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, सिनेमानंतर मिळाला आणखी एक प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:12 IST2025-02-11T13:12:02+5:302025-02-11T13:12:58+5:30

Mahakumbh's viral girl Monalisa : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकण्यासाठी आलेली एक तरूणी तिच्या सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली.

Mahakumbh's viral girl Monalisa won a big lottery, got another project after the movie | महाकुंभच्या व्हायरल गर्ल मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, सिनेमानंतर मिळाला आणखी एक प्रोजेक्ट

महाकुंभच्या व्हायरल गर्ल मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, सिनेमानंतर मिळाला आणखी एक प्रोजेक्ट

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकण्यासाठी आलेली एक तरूणी तिच्या सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की तिला कुंभ सोडून मध्य प्रदेशातील तिच्या घरी परतावे लागले. ही व्हायरल गर्ल म्हणजे मोनालिसा (Mahakumbh's viral girl Monalisa). तिला तिच्या लोकप्रियतेमुळे तिला एका चित्रपटाची ऑफर मिळाली. तिने ही ऑफर स्वीकारली असून त्याचे शूटिंग १२ फेब्रुवारीपासून इंडिया गेट, दिल्ली येथे होणार होते, परंतु काही परवानग्यांअभावी चित्रपटाचे चित्रीकरण तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. इतकेच नाही तर चित्रपटासोबतच अनेक ब्रँडही तिच्याकडे येत आहेत. महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसाने एका ज्वेलरी ब्रँड प्रमोट करण्यासाठी होकार दिला आहे.

मोनालिसाच्या चित्रपटाचे प्रमोशन पाहणाऱ्या टीमने एनडीटीव्हीला सांगितले की, एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडने तिच्याशी संपर्क साधला आहे. त्यासाठी तिला १५ लाख रुपयेही दिले जात आहेत. या डील अंतर्गत मोनालिसा १४ फेब्रुवारी रोजी या ब्रँडच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केरळलाही जाणार आहे. अशाप्रकारे महाकुंभच्या व्हायरल मुलीला आणखी एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

मोनालिसा दिसणार या सिनेमात
महाकुंभातून परतल्यानंतर मोनालिसा युट्युबवरही सक्रिय झाली असून ती तिथे व्हिडिओ बनवत आहे ज्याला खूप पसंती दिली जात आहे. मोनालिसाच्या डेब्यू चित्रपटाचे नाव डायरी ऑफ मणिपूर आहे. मोनालिसाचा चित्रपट सनोज मिश्रा दिग्दर्शित करत आहे, ज्याने तिला तिच्या गावी पोहोचल्यानंतर डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटासाठी साइन केले. या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी मोनालिसाला जवळपास २१ लाख रुपये मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे. तिला साइन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्यात आले आहेत.

Web Title: Mahakumbh's viral girl Monalisa won a big lottery, got another project after the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.