महाराष्ट्र सरकार देणार ‘पद्मावती’ला संरक्षण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:27 PM2017-11-17T16:27:25+5:302017-11-17T21:57:25+5:30
सध्या देशभर विरोध होत असलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला महाराष्ट्र सरकारकडून संरक्षण दिले जाणार आहे. होय, गुरुवारी ...
स ्या देशभर विरोध होत असलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला महाराष्ट्र सरकारकडून संरक्षण दिले जाणार आहे. होय, गुरुवारी राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, जेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री (शहरी) रंजित पाटील यांनी सांगितले की, ‘चित्रपटाला होत असलेला विरोध बघता, चित्रपट ज्या सिनेमागृहात रिलीज केला जाईल त्या सिनेमागृहाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल. रंजित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व उपाययोजनांवर विचार करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून आम्ही दररोजच्या स्थितीचा आढावा घेत आहोत.’ त्याचबरोबर पाटील यांनी हेदेखील स्पष्ट केले की, चित्रपटाला विरोध करणाºया काही संघटनांचे प्रतिनिधी आम्हाला भेटले असून, त्यांनी त्यांचे म्हणणे आमच्यासमोर मांडले आहे. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यातही आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. भन्साळी यांना सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यानेच सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपाचे नेते तथा फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि मजदूर संघाचे अध्यक्ष राम कदम यांनी चित्रपटाला जोरदार विरोध केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण एकीकडे सरकार चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याचे म्हणत असताना त्यांच्या पक्षातील एक नेता चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. दरम्यान, राम कदम यांनी म्हटले होते की, लोकांच्या भावना बघता, त्यांनी चित्रपटाला विरोध करण्याचा निर्धार केला आहे. संघ भविष्यात कधीही भन्साळींसोबत काम करणार नाही.
भन्साळी व्यतिरिक्त अभिनेत्री दीपिका पादुकोण हिलाही सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. राजपूत करणी सेनेकडून तर तिचे नाक कापणाºयास बक्षीस जाहीर केले आहे. करणी सेनेकडून १ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात चित्रपटाच्या विरोधाकरिता राष्ट्रव्यापी बंदचे आवाहन केले आहे. आता हा चित्रपट रिलीज होण्यास आणकी काय अडथळे येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.