"महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते...", अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान; या संगितकाराशी केली तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:54 IST2024-12-22T16:53:09+5:302024-12-22T16:54:59+5:30
"महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले..."

"महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते...", अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान; या संगितकाराशी केली तुलना
बॉलीवुड सिंगर अभिजीत भट्टाचार्य यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सलमान खान, शाहरुख खानसोबतच महात्मा गांधींवरही भाष्य केले आहे. यावेळी भट्टाचार्य म्हणाले, "संगितकार आरडी बरमन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. बरमन हे संगित विश्वाचे राष्ट्रपिता होते." एवढेच नाही, तर "महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते", असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधी यांची आरडी बरमन यांच्याशी तुलना -
शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. ज्याप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रपिता होते त्याचप्रमाणे आरडी बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते."
"महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता" -
अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, "महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले. जन्मदाते तर तेच होते. पिताही ते होते. अजोबाही ते होते, सर्व काही तेच होते."
बंगाली चित्रपटांत गाणे गाऊन केली करिअरची सुरुवात -
अभिजीत भट्टाचार्य यांच्या कामासंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांना संगीतकार आरडी बर्मन यांनी लाँच केले होते. त्यांनी त्यांचे पहिले गाणे आशा भोसले यांच्यासोबत बंगाली चित्रपटासाठी गायले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते आरडी बर्मन यांच्यासोबत गायक म्हणून स्टेज शो करायचे. अभिजीत भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठी गाणे गायले आहे.