माहिष्मती साम्राज्याचा सेनापती कटप्पाने तलवार सोडून रोखली बंदूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:48 AM2018-01-18T08:48:13+5:302018-01-18T14:22:28+5:30

जगभरात ‘बाहुबली’ या चित्रपटाने छाप सोडल्यानंतर प्रेक्षक चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चित्रपटात माहिष्मती साम्राज्याच्या सेनापतीची भूमिका ...

Mahatma's commander Captain Katpapan stopped the gun, leaving the gun! | माहिष्मती साम्राज्याचा सेनापती कटप्पाने तलवार सोडून रोखली बंदूक!

माहिष्मती साम्राज्याचा सेनापती कटप्पाने तलवार सोडून रोखली बंदूक!

googlenewsNext
भरात ‘बाहुबली’ या चित्रपटाने छाप सोडल्यानंतर प्रेक्षक चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चित्रपटात माहिष्मती साम्राज्याच्या सेनापतीची भूमिका साकारणारे कटप्पा आता नव्या लूकमध्ये बघावयास मिळणार आहेत. कटप्पांचे खरे नाव सत्यराज आहे. विविध भूमिका अतिशय खुबीने साकारण्यासासाठी प्रसिद्ध असलेले सत्यराज यांनी एक नवा चित्रपट साइन केला आहे. चित्रपटात ते एका पोलीस आॅफिसरची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या या थ्रिलर चित्रपटाचे नाव ‘हॉन्टेड रेडिओ रूम’ असे आहे. ‘कालापदम’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेले दिग्दर्शक वेले हे या चित्रपटाला दिग्दर्शित करणार आहेत. वेले हे हॉरर चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. 

याविषयी बोलताना वेले यांनी सांगितले की, माझ्या मते, चांगल्या कलाकाराची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा सत्यराज यांनी चित्रपटात काम करण्यास समर्थता दर्शविली, तेव्हा माझे अर्धे काम संपले असे मला वाटले. कारण ही भूमिका त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही अभिनेता करू शकत नाही. यावेळी वेले यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट एफएम रेडिओ स्टेशनवर आधारित एक सुपर हीरो थ्रिलर आहे. चित्रपटात एका विशेष रात्री एका रेडिओ स्टेशनवर विचित्र स्वरूपाच्या घटना घडत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. सध्या एका खºयाखुºया एफएम स्टेशनवर चित्रपटाची शूटिंग करण्याचे काम सुरू आहे. 



चित्रपटाची कथा तामीळ प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक आहे. त्यामुळे हा एक चांगला हॉरर चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, चित्रपटातील इतर कास्टची अद्यापपर्यंत निवड करण्यात आली नाही. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाला अधिक उत्तम बनविण्यासाठी प्रॉडक्शन स्तरावर भरपूर काम केले जात आहे. 

Web Title: Mahatma's commander Captain Katpapan stopped the gun, leaving the gun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.