प्रभासने नाकारल्या भूमिका अन् लॉटरी लागली महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला, बनले सुपरस्टार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:30 PM2022-03-12T13:30:05+5:302022-03-12T13:30:33+5:30

Radhye Shyam: 'राधे श्याम' स्टार प्रभास (Prabhas) खूप विचार करून चित्रपट साइन करतो. याच कारणामुळे त्याने बरेच असे चित्रपट नाकारले जे नंतर सुपरहिट ठरले.

Mahesh Babu and Allu Arjun got a lottery for the roles rejected by Prabhas, became superstars! | प्रभासने नाकारल्या भूमिका अन् लॉटरी लागली महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला, बनले सुपरस्टार!

प्रभासने नाकारल्या भूमिका अन् लॉटरी लागली महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला, बनले सुपरस्टार!

googlenewsNext

बाहुबली स्टार प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षित चित्रपट राधे श्याम (Radhye Shyam Movie) अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाची कथा आणि संकल्पना खूपच वेगळी आहे. याच कारणामुळे प्रभासच्या स्क्रिप्टच्या निवडीबाबत लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. फिल्मस्टार प्रभास अतिशय काळजीने चित्रपट साईन करतो. त्यामुळे त्याने असे चित्रपट नाकारले, जे नंतर सुपरहिट ठरले. प्रभासने नाकारलेल्या चित्रपटांमुळे टॉलीवूड सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांची चित्रपट कारकीर्द घडवली. 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महेश बाबूच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ओकाडूची ऑफर पहिल्यांदा प्रभासला मिळाली होती. त्यावेळी प्रभासला या चित्रपटाची कथा थोडी जोखमीची वाटली. त्यामुळे त्याने हा चित्रपट नाकारला. नंतर हा चित्रपट महेश बाबूकडे गेला आणि मग हा चित्रपट सुपरहिट ठरला. 


प्रभासला यापूर्वी दिग्दर्शक सुकुमार यांच्या आर्या चित्रपटाची ऑफरही आली होती. त्यावेळी अभिनेत्याला हा चित्रपट आवडला नाही आणि त्याने चित्रपट नाकारला. पुढे या चित्रपटात अल्लू अर्जुनची एंट्री झाली आणि या चित्रपटाने या अभिनेत्याला रातोरात मोठा स्टार बनवले.


प्रभासने नाकारलेल्या चित्रपटांमुळे फक्त महेश बाबू, अल्लू अर्जुनच नाही तर अभिनेता नितीन (दिल चित्रपट), ज्युनिएर एनटीआर (सिम्हाद्री, बृंदावनम, ओसारवेल्ली), राम चरण (नायक), रवि तेजा (किक, डॉन श्रीनु) हे कलाकार स्टार झाले.

Web Title: Mahesh Babu and Allu Arjun got a lottery for the roles rejected by Prabhas, became superstars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.