साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सख्या मोठ्या भावाचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 12:30 PM2022-01-09T12:30:31+5:302022-01-09T15:19:30+5:30
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu)कोरोना पॉझिटिव्ह असून तो सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu)कोरोना पॉझिटिव्ह असून तो सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू गरू यांचे निधन झाले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Mahesh Babu brother Ramesh Babu died) ते बरेच दिवस आजारी होते. रमेश बाबू यांच्या निधना(Ramesh Babu Passed awayची बातमी कळताच सोशल मीडियासह इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.
रमेश बाबू गरू(Ramesh Babu Garu) हे साऊथचे सुपरस्टार महेश बाबूचा मोठा भाऊ आणि सुपरस्टार कृष्णा यांचा मोठा मुलगा होते. ते 56 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून यकृताच्या समस्येने त्रस्त होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताला दुजोरा देत चित्रपट निर्माते बीए राजू यांनी ट्विट केले.
It is with deep sorrow that we announce the passing of our beloved Ramesh Babu garu. He will continue to live on in our hearts forever.
— BA Raju's Team (@baraju_SuperHit) January 8, 2022
We request all our well-wishers to adhere to the COVID norms and avoid gathering at the cremation venue.
- Ghattamaneni Family
चित्रपट निर्माते बीए राजू यांनी ट्विट केले की, “आम्ही आमच्या लाडक्या रमेश बाबू गरू यांचे निधन झालं. तो सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. आम्ही आमच्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे आणि स्मशानाच्या इथं एकत्र येणं टाळावे.
रमेश बाबू यांनी 1974 मध्ये 'अल्लुरी सीताराम राजू' या चित्रपटाद्वारे ऑन-स्क्रीन फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 1997 मध्ये त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पुढे तो निर्माता झाला. त्यांनी 'अर्जुन' आणि 'अतिथी' या चित्रपटांची निर्मिती केली ज्यात महेश बाबू मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होता.