महेश बाबूचा सावत्र भाऊ करतोय चौथं लग्न, शेअर केला रोमॅन्टिक लिपलॉक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:35 PM2023-01-01T12:35:23+5:302023-01-01T12:35:45+5:30

Mahesh Babu Step Brother Naresh Babu : साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू अचानक चर्चेत आला आहे. होय, एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट करत नरेश बाबूने आपल्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे....

Mahesh Babu Step Brother Naresh Babu Getting Married Lip Lock Video With Pavitra Lokesh | महेश बाबूचा सावत्र भाऊ करतोय चौथं लग्न, शेअर केला रोमॅन्टिक लिपलॉक VIDEO

महेश बाबूचा सावत्र भाऊ करतोय चौथं लग्न, शेअर केला रोमॅन्टिक लिपलॉक VIDEO

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेश बाबू (Mahesh Babu Step Brother Naresh Babu ) अचानक चर्चेत आला आहे. होय, एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट करत नरेश बाबूने आपल्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे. नरेश बाबू हा सुद्धा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश ( Pavitra Lokesh) यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नरेश व पवित्रा लोकेश यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत नरेश व पवित्रा केक कापतात, एकमेकांना भरवतात आणि मग रोमॅन्टिक होत एकमेकांना किस करतात. आम्ही लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा नरेश व पवित्रा यांनी या व्हिडीओद्वारे केली आहे. सोबत चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अर्थात या व्हिडीओने चाहत्यांना कन्फ्युज केलं आहे. तुम्ही खरंच लग्न करणार आहात की मग हा तुमच्या आगामी शो वा सिनेमाचा प्रोमो आहे, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. नरेश व पवित्रा लवकरच एका सीरिजमध्ये एकत्र दिसणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. अद्याप नरेश व पवित्रा यांच्या प्रवक्त्यांनी याबद्दल मौन बाळगलं आहे.

नरेश बाबूची तीन लग्न झाली आहेत. काही कारणांमुळे त्याचे तिन्ही पत्नींसोबतचे नातेसंबंध संपुष्टात आले. सध्या नरेश एकटा राहतो. पवित्राबद्दल सांगायचं, तर ती अलीकडेच पती सुचेंद्र प्रतापपासून विभक्त झाली आहे. अर्थात दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाही. खास बात म्हणजे, पवित्रा लोकेश हिने महेशबाबूच्या ‘सरकारू वाटी पाटा’ या सिनेमात त्याच्या आईची भूमिका साकारली होती.

कोण आहे नरेशबाबू?
विजया कृष्ण नरेश असं नरेशबाबूचं पूर्ण नाव आहे. अभिनेता, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे.  1970 साली बालकलाकार म्हणून त्याने अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली. त्याने सुमारे 200 चित्रपटांत काम केलं. नरेश बाबू हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. नरेश हा दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. परंतु, पतीच्या निधनानंतर विजया यांनी अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केलं. महेश बाबू, विजया आणि कृष्णा यांचा मुलगा आहे. 

बायकोनं चपलेनं मारलं...

नरेश बाबू आणि त्यांची तिसरी पत्नी रम्या रघुपती यांचे संबंध चांगले नसून त्यांच्यांत काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या.  नरेश बाबूला त्याच्या पत्नीनं मारहाण  केल्याचा व्हिडीओ अलीकडे समोर आला होता. हॉटेलमध्ये राहणाºया  नरेशला तिसरी पत्नी रम्यानं चपलीनं मारहाण केली होती. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.  नरेश हा चौथ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. यातच तो हॉटेलमध्ये अन्य स्त्रीसोबत दिसला. त्यामुळे रम्याला राग अनावर झाला आणि तिनं मारहाण केली होती. 

Web Title: Mahesh Babu Step Brother Naresh Babu Getting Married Lip Lock Video With Pavitra Lokesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.