​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत नाही, पण सलमान चुकतो तेव्हा त्याचा बोभाटा होतो...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 06:19 AM2018-04-08T06:19:32+5:302018-04-08T11:49:32+5:30

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि दोन रात्री तुरुंगात काढल्यानंतर काल त्याला जामीन ...

Mahesh Manjrekar said, 'Who is not wrong, but when Salman misses it, he gets the point ... !! | ​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत नाही, पण सलमान चुकतो तेव्हा त्याचा बोभाटा होतो...!!

​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत नाही, पण सलमान चुकतो तेव्हा त्याचा बोभाटा होतो...!!

googlenewsNext
ळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि दोन रात्री तुरुंगात काढल्यानंतर काल त्याला जामीन मंजूर झाला. याकाळात बॉलिवूडमधील अनेक माणसं सलमानच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीत. यात एक नाव होते, अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे. होय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख असलेल्या महेश मांजरेकर यांनी सलमानला जाहिर पाठींबा दर्शवला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सलमानचा बचाव केला.



सलमान एक अशी व्यक्ती आहे, जी आरोप स्वत:वर घ्यायला कायम तत्पर असते. शेवटपर्यंत तो स्वत:तील माणुसकी निभवतो. चूक कोण करत नाही. मीही अनेकदा चुकलो आहे. पण सलमान चूक करतो तेव्हा त्याचा बोभाटा केला जातो. त्याच्या चूकांवर नेमके बोट ठेवले जाते. सलमान माझ्यासाठी मित्रापेक्षा खूप काही आहे. सलमानचे काय होईल, असे दोन दिवसांपासून माझी पत्नी मला विचारत होती. तो लवकरच सुटेल, केवळ इतकेच मी तिला सांगत होतो. काय झाले होते, मला ठाऊक नाही. हा निर्णय न्यायालयाला करायचा आहे. पण माझे मत तुम्ही मला विचाराल तर मी केवळ इतकेच म्हणेल की, सलमानची सुटका व्हावी. असे महेश मांजरेकर म्हणाले.
सलमान तुरुंगातून बाहेर आल्यावर काल रात्री मुंबईतील आपल्या घरी पोहोचला. यावेळी महेश मांजरेकर त्याला भेटायला त्याच्या घरी पोहोचले. महेश मांजरेकर यांनी सलमानसोबत अनेक चित्रपट केले आहेत. ‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘रेडी’,‘जय हो’ यासारख्या चित्रपटात महेश मांजरेकर व सलमान एकत्र दिसले होते.

ALSO READ : सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला! आता कधीच करणार नाही ‘हे’ काम!

काळवीट शिकार प्रकरणी गत ५ एप्रिलला जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, निलम या अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती. यानंतर काल शनिवारी सत्र न्यायालयाने सलमानला जामीन मंजूर केला आणि यानंतर काही तासांत सलमान तुरूंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर येताच, सलमान एका चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाला. मुंबईत हजारो चाहते सलमानच्या घरासमोर जमले होते. या चाहत्यांना भेटताना सलमान भावूक झालेला दिसला. 

Web Title: Mahesh Manjrekar said, 'Who is not wrong, but when Salman misses it, he gets the point ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.