ती फुटपाथवर झोपली! लोक म्हणाले, सलमान खान से बचकर रहना...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 13:06 IST2019-06-04T13:05:01+5:302019-06-04T13:06:14+5:30
मॉडेल आणि टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा विचित्र वागण्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी या माहिका शर्माने काय केले होते, हे तुम्हाला आठवत असेलच. तिने अख्ख्या जगासमोर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.

ती फुटपाथवर झोपली! लोक म्हणाले, सलमान खान से बचकर रहना...!!
मॉडेल आणि टीव्ही अॅक्ट्रेस माहिका शर्मा विचित्र वागण्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी या माहिका शर्माने काय केले होते, हे तुम्हाला आठवत असेलच. तिने अख्ख्या जगासमोर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. राहुल गांधींचा फोटो शेअर करत तिने आपले प्रेम व्यक्त केले होते. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफरीदीवर तिचा जीव जडला होता. यावरून माहिका बरीच ट्रोल झाली होती. पण ट्रोलिंगची पर्वा करणाºयांपैकी माहिका नाहीच.
आता ही माहिका शर्मा तिच्या ताज्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. होय, तिचे फुटपाथवरचे फोटोशूट जाम चर्चेत आहेत. या फोटोत माहिका फुटपाथवर झोपलेली दिसतेय. माहिकाने हा फोटो शेअर केला आणि या फोटोसोबतच्या कॅप्शनने तिचे हे फोटोशूट चर्चेत आले.
‘जब घर दूर हो और आप आराम करना चाहते हो, अंदाज अपना अपना...रास्तों पे रहना पसंद है मुझे...,’ असे माहिकाने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले. तिचे हे कॅप्शन वाचून युजर्सनी माहिकाला ट्रोल करणे सुरु केले.‘सलमान खान से बचकर रहना,’ असे एका युजरने यावर लिहिले. एका युजरने ‘राहुल गांधी का क्या हुआ’, असा सवाल माहिकाला केला.
माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे कळतेय. ‘द मॉडर्न कल्चर’या चित्रपटात ती ब्रिटीश अॅडल्ट स्टार डॅनी डीसोबत काम करताना दिसणार आहे. मध्यंतरी माहिकाने डेनीबद्दलचे आपले प्रेम जगजाहिर केले होते. डेनी माझे लक आहे. माझा सुपरहिरो आहे़. होय, मी अॅडल्ट फिल्म्स पाहते आणि यात काहीही चुकीचे नाही़, असे ती म्हणाली होती. बिग बॉसच्या १२ व्या सीझनमध्ये माहिका व डॅनी डी एकत्र जाणार, अशी चर्चा गतवर्षी रंगली होती. पण ही चर्चा अफवा निघाली.