ऐकावं ते नवल! राखी सावंतनेच आणला 'कोरोना व्हायरस' बॉलिवूडच्या अभिनेत्रीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:05 IST2020-03-19T16:58:41+5:302020-03-19T17:05:27+5:30
कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी तिनं राखीला जबाबदार ठरवले आहे.

ऐकावं ते नवल! राखी सावंतनेच आणला 'कोरोना व्हायरस' बॉलिवूडच्या अभिनेत्रीचा दावा
कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४९ रुग्ण आहेत. अनेक सेलिब्रेटींनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. राखी सावंत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करतेय. राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातील अभिनेत्री माहिका शर्माने राखी सावंतला टोमणा मारला आहे. माहिका म्हणतेय, कोरोना व्हायरस राखी सावंत भारतात घेऊन आली आहे.
माहिका शर्माने मजेशीर अंदाजात राखी सावंतचा या व्हायरस पासून आपल्याला वाचवू शकते. माहिकाने राखी सावंतच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर कमेंट केली आहे. माहिका पुढे म्हणाली, राखी सावंत आपल्या फनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला वाचवू शकते. आज काल आपण खूप बोर होतो आहे. अशात तिचे व्हिडीओच आपला जीव वाचवू शकतात.
राखी सावंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात राखीने चीन लोकांना खडेबोल सुनावले होते. ती म्हणाली होती, या लोकांना चांगलाच धडा मिळाला आहे प्राण्यांना खाण्याचा. त्यांना हे सगळं खायला नको. देवा या पापी लोकांना माफ करा. अशा शब्दात राखीने चीनवर टीकेची झोड उठवली आहे.