ऑलिम्पिक खेळाडूच्या प्रेमात होती महिमा चौधरी, पण ठरली कमनशिबी, म्हणाली- "त्याने माझ्याबरोबर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:01 IST2024-08-02T13:00:48+5:302024-08-02T13:01:26+5:30
महिमा चौधरीला डबल डेट करत होता ऑलिम्पिक खेळाडू, दुसरं अफेअर समजताच बसला धक्का, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

ऑलिम्पिक खेळाडूच्या प्रेमात होती महिमा चौधरी, पण ठरली कमनशिबी, म्हणाली- "त्याने माझ्याबरोबर..."
महिमा चौधरी ही ९०च्या दशकातील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. १९९७ साली सुभाष घई यांच्या परदेस या सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. धडकन, बागबान, दिल क्या करे, खिलाडी ४२०, सँडविच अशा सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. बॉलिवूडमधील करिअरबरोबरच महिमा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं.
लिएंडर पेसच्या प्रत्येक मॅचदरम्यान महिमा स्टेडियमध्ये त्याला चिअर करताना दिसायची. जवळपास ३ वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. मॉडेल रिया पिल्लईबरोबर लिएंडर पेसचे प्रेमसंबंध होते. आणि त्यामुळेच महिमाने त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्याची चर्चा होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमाने तिच्या या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "तो नक्कीच एक चांगला खेळाडू असेल. पण, तो माझ्याशी चुकीचं वागला".
"तो दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, हे समजल्यावर मला धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही. त्यामुळे मी जास्त स्ट्राँग झाले", असंही पुढे महिमाने सांगितलं. महिमाने २००६ साली बिजनेसमॅन बॉबी मुखर्जीशी लग्न करत संसार थाटला होता. पण, २०११ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे.
लिएंडर पेस हा भारताचा एक उत्कृष्ट माजी टेनिसपटू आहे. त्याने तब्बल ८ वेळा ग्रँड स्लॅम टायटल नावावर केलं आहे. १९९६ अँटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर त्याने नाव कोरलं होतं. त्याला १९९६मध्येच खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.