Mahima Chaudhry : कॅन्सरचं निदान झाल्यावर खचली होती महिमा, लेकीनं दिलं बळ; वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:24 AM2022-06-10T10:24:07+5:302022-06-10T10:24:47+5:30

Mahima Chaudhry : महिमाला कॅन्सरचं निदान होताच, ती आतून पूर्णपणे कोलमडली होती. पण तिच्या 15 वर्षांच्या मुलीनं या काळात तिला धीर दिला. तिने आईची पूरेपूर काळजी घेतली.

Mahima Chaudhry says she is cancer-free, reveals daughter did not go to school during her treatment | Mahima Chaudhry : कॅन्सरचं निदान झाल्यावर खचली होती महिमा, लेकीनं दिलं बळ; वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

Mahima Chaudhry : कॅन्सरचं निदान झाल्यावर खचली होती महिमा, लेकीनं दिलं बळ; वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

googlenewsNext

Mahima Chaudhry on daughter Aryana Chaudhry:  25 वर्षांपूर्वी ‘परदेस’ या चित्रपटातून अ‍ॅक्टिंगच्या जगात पाऊल ठेवणारी अभिनेत्री महिमा चौधरीला  (Mahima Chaudhry ) ब्रेस्ट कॅन्सर झाला (Mahima Chaudhry Breast Cancer) आहे. काल अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर महिमाचा एक व्हिडीओ शेअर करत, हा धक्कादायक खुलासा केला. महिमाला कॅन्सरचं निदान होताच, ती आतून पूर्णपणे कोलमडली होती. पण तिच्या 15 वर्षांच्या मुलीनं  (Mahima Chaudhry daughter Aryana Chaudhry) या काळात तिला धीर दिला. तिने आईची पूरेपूर काळजी घेतली. अगदी 2 महिने ती शाळेतही गेली नाही.

महिमा चौधरी आता कॅन्सरमधून बाहेर पडली आहे. सध्या ती अनुपम खेर यांच्यासोबत लखनौ येथे The Signature या चित्रपटाचं शूटींग करत आहेत. महिमानं तिच्या उपचाराबद्दल बोलताना भावुक झाली. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर लेकीनं आपली कशी काळजी घेतली, हे सांगताना तिला अश्रू अनावर झालेत. ती म्हणाली,‘मला कॅन्सरचं निदान झाल्यावर मी घाबरले होते. पण माझी 15 वर्षांची लेक अर्याना माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. मी घरीचं राहणार, शाळेत जाणार नाही, हे तिनं आधीच स्पष्ट केलं. कारण तिला कोरोना व्हायरस घरी आणायचा नव्हता. तिला आणखी एक संकट नको होतं. त्यावेळी मी रिकव्हरी स्टेजमध्ये होते. त्यामुळे कोरोनानंतर शाळा उघडली तरी अर्यानानं शाळेत जाण्यास नकार दिला. तिने ऑनलाईन क्लास केलेत.’

मी कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत गेले नाही. मी मुंबईतच उपचार घेतले. माझ्यावरचे उपचार पूर्ण झाले आहेत आणि मी आता ठीक आहे,असंही तिने सांगितलं.
महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाद्वारे महिमा चौधरीची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. ‘परदेसमध्ये महिमा चौधरीने गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय महिमाने  दिल क्या करे,  लज्जा, धडकन,  दिवाना,  दिल है तुम्हारा,  ओम जय जगदीश  असे अनेक चित्रपट केले आहेत.

महिमा शेवटची2016 मध्ये बंगाली क्राइम थ्रिलर ‘डार्क चॉकलेट’ मध्ये दिसली होती.  मात्र हळूहळू लाईमलाईटपासून दूर होत गेली. तिने बिझनेसमॅन बॉबी मुखर्जीसोबत संसार थाटला. पण तिच्या वैवाहिक आयुष्यातही कुरबुरी वाढल्या. अखेर लग्नानंतर  2013 साली  दोघेही वेगळे झाले. महिमा आणि बॉबी मुखर्जी यांनी आजपर्यंत घटस्फोट घेतला नसला तरी दोघेही वेगळे राहतात. विभक्त झाल्यानंतर मुलीच्या कस्टडीसाठी महिमाला अनेक वर्ष कोर्टाच्या फे-या कराव्या लागल्या होत्या. अखेर मुलीची कस्टडी आई महिमा चौधरीलाच देण्यात आली. तेव्हापासू महिमा एकटीनेच मुलगी अरियानाचा सांभाळ करत आहे. तिने मुलगी अर्यानाला एकटीने वाढवलं.  

Web Title: Mahima Chaudhry says she is cancer-free, reveals daughter did not go to school during her treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.