शाहरूखच्या या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील डाग पाहून हैराण झाले लोक, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:12 IST2019-11-29T18:11:03+5:302019-11-29T18:12:09+5:30
शाहरूख खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं विना मेकअप असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

शाहरूखच्या या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील डाग पाहून हैराण झाले लोक, फोटो होतोय व्हायरल
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखसोबत रईस चित्रपटात झळकलेली अभिनेत्री माहिरा खान एका फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. या फोटोत माहिराच्या चेहऱ्यावरील डाग दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
अभिनेत्री माहिरा खानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिलंय की, मुख्खो फ्रेकल्स.
फ्रेकल्स हा स्किन प्रॉब्लेम आहे. ज्यात चेहऱ्यावरील डाग दिसू लागतात. जास्त उन्हात राहिल्यामुळे किंवा हार्मोनल प्रॉब्लेममुळे ही समस्या उद्भवते. काही युजर्सनं हा फोटो खोटा असल्याचं सांगितलं तर काहींनी या अभिनेत्रीच्या सुंदरतेची प्रशंसा केली. एका युजरनं म्हटलं की, तू खूप सुंदर दिसते आहे. एकाने म्हटलं की, हा फोटो पाहून तुझ्यावर आणखीन जास्त प्रेम होत आहे. हा फोटोत फिल्टर वापरल्याचंही म्हटलं जात आहे.
माहिरा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नेहमी तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच ती रईस चित्रपटातील व्हिडिओदेखील शेअर करत असते.
माहिराने बॉलिवूडमध्ये शाहरूखसोबत पदार्पण केले आणि तिला बॉलिवूडमध्ये काम देखील करायचे होते. मात्र ते शक्य झालं नाही. रईसच्या रिलीजच्या वेळी मनसे नेता राज ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यास विरोध केला होता. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनपासून माहिराला दूर ठेवण्यात आलं.
त्यानंतर माहिराने कोणत्याच बॉलिवूड चित्रपटात काम केलं नाही.