मेहमूदच्या ‘लाखो मे एक’चा रिमेक होणार : कोण साकारणार मेहमूद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 01:17 PM2017-01-29T13:17:07+5:302017-01-29T18:47:07+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘एअरलिफ्ट’च्या यशाने उत्साहित झालेल्या निर्मात्यानी कॉमेडी लिजेंड मेहमूदच्या चित्रपटाचा रिमेक बणविण्याची तयारी ...

Mahmood's 'Lakho Mein Ek' will be remake: Who will be able to play Mahmood? | मेहमूदच्या ‘लाखो मे एक’चा रिमेक होणार : कोण साकारणार मेहमूद

मेहमूदच्या ‘लाखो मे एक’चा रिमेक होणार : कोण साकारणार मेहमूद

googlenewsNext
लिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘एअरलिफ्ट’च्या यशाने उत्साहित झालेल्या निर्मात्यानी कॉमेडी लिजेंड मेहमूदच्या चित्रपटाचा रिमेक बणविण्याची तयारी चालविली आहे. यासाठी ‘अबुनदातिया एंटरटेनमेंट’च्या विक्रम मल्होत्राने ७०च्या दशकात सुपरहिट ठरलेल्या मेहमूद यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाखो मे एक’ या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहे. या जुण्या चित्रपटाला विक्रम नवा टच देणार असल्याचे सांगण्यात येते. 

एअरलिफ्टचा निर्माता विक्रम मल्होत्राच्या ’अबुनदातिया एंटरटेनमेंट’चे आगामी ‘नूर’ व ‘नाम शबाना’ हे चित्रपट आगामी काळात रिलीज होणार आहेत. या दोन चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मेहमूदच्या चित्रपटावर काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात यत आहे. मेहमूद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लाखो मे एक’ हा चित्रपटात एका अनाथ मुलाची कथा आहे. गरीबी व त्रास सहन करणाºया या मुलाला एक दिवस त्याचे वडील एक श्रीमंत व्यक्ती असल्याचे कळेते. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस. बालन यांनी केले होते. ‘लाखो मे एक ’ हा तामीळ चित्रपट ‘एथिर नीचल’चा रिमेक होता. आता पुन्हा त्याचा रिमके करण्यात येत आहे. Read More : ​शाहरुख खान म्हणतो, माझा मुलगा अबराम नव्या पिढीचा ‘सुपरस्टार’



‘लाखो मे एक’ या चित्रपटात मेहमूदने भोला ही भूमिका साकारली होती. तो एका चाळीत राहतो व विपरित परिस्थितीत यशस्वी ठरतो. त्याच्या दिवसाची सुरुवात संघर्षातून होते. बक्षीसी मिळावी यासाठी तो दररोज एका दरवाजावर जातो व म्हणतो, ‘भोला आला आहे’, मात्र त्याला काहीच मिळत नाही. या चित्रपटात प्राण यांनी शेर सिंग ही भूमिका केली होती, शेर सिंगच्या मनात भोला बद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. भोलाच्या प्रेयसी गौरीची भूमिका राधा सलूजा हिने साकारली होती. गौरीच्या आईची भूमिका ललिता पवार यांना देण्यात आली होती. या चित्रपटातील ‘चंदा ओ चंदा’ हे गाणे जबरदस्त हिट ठरले होते. Read More : अक्षय कुमार म्हणतो संघर्ष चित्रपटाने माझ्यात अभिनेता म्हणून अनेक बद्दल केले

विक्रम मल्होत्रा निर्मित ‘लाखो मे एक’च्या रिमेकमध्ये मेहमूदची भूमिका कोण साकारणार हे अद्याप सांगण्यात आले नसले तरी देखील यासाठी अक्षयचे नाव आघाडीवर असल्याचे समजले जात आहे. अक्षयने एअरलिफ्टमध्ये मुख्य भूमिका तर नाम शबाना मध्या किमोओ केला आहे. 

ALSO READ
बॉलीवूड सक्सेस मंत्रा : साऊथ का रिमेक बनाओ और पैसे कमाओ
​तमन्ना बनणार तामिळमधील ‘क्वीन’!

Web Title: Mahmood's 'Lakho Mein Ek' will be remake: Who will be able to play Mahmood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.