अभिनेत्री भाग्यश्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली- "मला विश्वास बसत नाहीये की, इतकी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:20 IST2025-01-23T13:19:33+5:302025-01-23T13:20:41+5:30
'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे. तिथे आलेला खास अनुभव तिने सांगितला (bhagyashree)

अभिनेत्री भाग्यश्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली- "मला विश्वास बसत नाहीये की, इतकी..."
सध्या भारतात महाकुंभमेळ्याचं पवित्र आणि धार्मिक वातावरण आहे. जगभरातले भाविक आणि श्रद्धाळू माणसं महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवत आहेत. साधूंपासून सामान्य माणसं ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक व्यक्ती महाकुंभमेळ्यात (Mahakumbhmela) हजेरी लावत आहेत. अशातच 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीने प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवली. त्यावेळी भाग्यश्रीने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
भाग्यश्रीने सांगितला महाकुंभमेळ्याचा अनुभव
भाग्यश्रीने ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "सहकुटुंब महाकुंभमेळ्याला आनंद काहीतरी वेगळाच आहे. सरकारने या कार्यक्रमाचं अत्यंत उत्कृष्ट आयोजन केलंय. उत्तम नियोजन करुन सरकारने जगभरातील लोकांना महाकुंभमेळ्यात येण्यासाठी आकर्षित केलंय. आम्ही सध्या कुंभ गावात आहोत. शौचालय, गर्दीचं नियोजन अशा सर्वच पातळींवर सरकारने व्यवस्थित काम केलंय. गंगा नदीत पवित्र स्नान करण्यास आम्ही उत्सुक आहोत." अशाप्रकारे भाग्यश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्यात.
महाकुंभमेळ्यात सेलिब्रिटींची उपस्थिती
महाकुंभमेळ्यात बिझनेसपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी उपस्थिती दर्शवली आहे. मराठमोळा अभिनेता सौरभ चौगुलेने महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवली. याशिवाय बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर, अभिनेत्री भाग्यश्री यांनीही महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. येत्या काही दिवसांमध्ये अमिताभ बच्चन, आलिया भट, रणबीर कपूर, अनुप जलोटा, रेणुका शहाणे, आशुतोष राणा हे कलाकार महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.