या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने महिनाभर पुरवला होता भाग्यश्रीचा पिच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:27 PM2020-04-23T14:27:23+5:302020-04-23T14:28:55+5:30

अनेक वर्षानंतर मुलाने केला खुलासा

Maine Pyar Kiya Director Sooraj Barjatya Pursued Bhagyashree For Over A Month, Reveals Son Abhimanyu Dassani-ram | या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने महिनाभर पुरवला होता भाग्यश्रीचा पिच्छा!!

या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने महिनाभर पुरवला होता भाग्यश्रीचा पिच्छा!!

googlenewsNext
ठळक मुद्दे सलमानचा हा पहिला सोलो चित्रपट होता तर भाग्यश्रीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते.

1989 मध्ये आलेल्या ‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील प्रेम आणि सुमनची जोडी आठवते ना? या जोडीने प्रत्येक वयोगटातील सिनेप्रेमींच्या मनात जागा मिळवली. प्रेमच्या भूमिकेतील सलमान खान आणि सुमनची व्यक्तिरेखा रंगवणारी भाग्यश्री हे दोघेही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. सलमानचा हा पहिला सोलो चित्रपट होता तर भाग्यश्रीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले, बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम नोंदवले. अर्थात याऊपरही प्रेम व सुमनची जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही.

‘मैनें प्यार किया’नंतर सलमानची गाडी सूसाट निघाली. याऊलट भाग्यश्रीच्या करिअरला ओहोटी लागली. यापश्चात भाग्यश्रीने हिमालय दसानीसोबत संसार थाटला. आता अचानक हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, इतक्या वर्षानंतर या चित्रपटाशी संबंधित असलेला एक किस्सा समोर आलाय. होय, भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू याने हा खुलासा केला आहे.

होय, ‘मैनें प्यार किया’साठी भाग्यश्रीचा होकार मिळवण्यासाठी सूरज बडजात्यांनी जवळजवळ महिनाभर तिचा पाठलाग केला होता, असे अभिमन्यूने सांगितले.

त्याने सांगितले की, ‘मैनें प्यार किया’ सुपरडपुर हिट झाला. पण या चित्रपटाबद्दलचा हा किस्सा कदाचित कोणालाच ठाऊक नसावा.  सुरज बडजात्या यांनी या चित्रपटासाठी माझ्या आईचा होकार मिळवण्याठी महिनाभर तिचा पिच्छा पुरवला होता. तिची मनधरणी करण्यासाठी त्यांनी ना-ना प्रयत्न केलेत. अखेर तिने होकार दिला. आईसारखेच मला कास्ट करण्यासाठी सुद्धा निर्माता-दिग्दर्शकांनी असेच माझ्या मागे फिरावे, असे मला अनेकदा वाटते, असेही तो म्हणाला.

 ‘मैनें प्यार किया’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, संगीत दिग्दर्शक, गायक असे सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात सलमान खानने एक खास काळ्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता. सूरज बडजात्या यांना याची कल्पना हॉलीवुड अभिनेता टॉम क्रूजचा चित्रपट टॉप गन पाहून सुचली होती.

Web Title: Maine Pyar Kiya Director Sooraj Barjatya Pursued Bhagyashree For Over A Month, Reveals Son Abhimanyu Dassani-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.